Top News

पोस्टाचे बोगस नियुक्तीपत्र देऊन केली बेरोजगारांची फसवणूक #chandrapur #pombhurna #postoffice


मोठा रॅकेट सक्रिय असण्याची शक्यता?


पोंभूर्णा:- बेरोजगार युवकांच्या असाह्यतेचा फायदा घेत भारतीय डाक विभागात नौकरीचे बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकांची फसवणूक केल्या प्रकरणी अरविंद जनार्दन किन्हेकार रा.कोरंबी ता.मुल यांच्या तक्रारीवरून पोंभूर्णा पोलिस स्टेशन येथे तिन ठगबाजाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आले असून सदर फसवणूक प्रकरणात आणखीन मासे अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्पर्धा परिक्षेची तयारी व शासकीय नौकरीसाठी प्रयत्न करीत असलेला अरविंद हा १० नोव्हेंबरला चंद्रपूर बस स्टॉप येथे बसून असतांना एक इसम त्याला भेटून पोस्ट आफिसमध्ये नौकरी लावून देतो असल्याची बतावणी केली असता अरविंद यांनी घरच्यांशी चर्चा करून त्यांनी संबंधिताला फोन केले.

पोस्ट आफीस मध्ये पोस्टल असिस्टंट पदासाठी ८ लाख रूपयात डिल करण्यात आली. बोलल्याप्रमाणे ९ डिसेंबरला आरोपी अंकुश पवार,चौधरी मॅडम,साने मॅडम हे तिघेही पोंभूर्णा पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जामतुकूम पोस्ट आफिसमध्ये आले. तक्रारदार अरविंद किन्हेकार व गडचिरोली जिल्ह्यातील माल्लेर चेक येथील हर्षद शेट्टे यांना आरोपींनी जामतुकूम पोस्ट आफिसमध्ये बनावट नियुक्तीपत्र देण्यात आले.सोबतच थंब मशीनही देण्यात आले.

यावेळी आरोपींनी अरविंद किन्हेकार व हर्षद शेट्टे यांचेकडून प्रत्येकी २५ हजार रुपये टोकन अमाऊंट घेतले.सदर दोघांनी कामही सुरू केले मात्र पोस्ट आफिस इन्स्पेक्टर मनिष ठवकर हे जामतुकूम येथे आले असता यासारखी कोणतीही नियुक्ती न झाल्याचे सांगताच फसवणूक झालेल्या किन्हेकार व शेट्टे यांनी तिघांविरुद्ध पसवणूकीची तक्रार दाखल केली.

या प्रकरणी तिघांविरुद्ध कलम ४२०, ४६८, ४७१, ३४ भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास ठाणेदार धर्मेंद्र जोशी करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने