Top News

चिंचोली (खुर्द)येथे श्रीगुरुदेव कार्यकर्ता मेळावा संपन्न #chandrapur #Rajura


गावाच्या विकासासाठी घर तेथे ग्रामगीता अभियान राबवा:- बऱ्हाटे


राजुरा:- राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेमध्ये ग्रामविकासाची अनेक सूत्रे दिलेली आहे .कृषी विकासाच्या दृष्टीने राष्ट्रसंतांची ग्रामगीता गावोगावात अमलात यायला हवी,त्याकरिता ग्रामगीता घरोघरी जाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन जिल्हा कृषी अधिकारी भाऊ ब-हाटे यांनी केले.

चिंचोली खुर्द येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तालुक्यातील श्रीगुरुदेव प्रचारक कार्यकर्ते मंडळींचा मेळावा संपन्न झाला. 

कार्यक्रमाचे उदघाटन जिल्हा कृषी अधिकारी भाऊ बऱ्हाटे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी सेवा मंडळाचे केंद्रिय सदस्य ॲड. राजेंद्र जेनेकर होते.‌प्रमुख अतिथी म्हणून लटारु मत्ते प्रचारप्रमुख,ॲड सारीका जेनेकर जिल्हामहिलाप्रमुख,आनंदराव डफ,गजानन बोबडे,चंद्रकला ढवस,शैलेश कावळे,मनोहर बोबडे,प्रभाकर बोबाटे,बाळा गोहोकर,केवाराम डांगे,अनिल चौधरी,लता ठमके,नामदेव पेचे,निखिल चवले, छत्रपती गेडाम आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्तविक शाखाध्यक्ष जनार्धन हिंगाणे यांनी केले तर वामनराव देवतळे,अनिल पिदूरकर,अविनाश ठाकरे,नरेंद्र मोहारे, आदी प्रचारकांनी विचार व्यक्त केले.

 नानाजी देवाळकर,रामदास चौधरी,रमेश मादासवा‌र, प्रकाश ढोबे व विनायक सोयाम या प्रचारकांचा श्री गुरुदेव मासिकाबद्दल अतिथीच्या हस्ते तसेच उत्कृष्ट कार्याबद्दल भाऊ बऱ्हाटे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन व आभार विकास हिंगाणे यांनी केले. 

रात्रौला प्रसिद्ध कीर्तनकार प्रा. अशोक चरडे चिमूर यांचे जाहिर कीर्तन झाले.समारोपीय काल्याचे कीर्तन दत्ता मसे महाराज यांनी केले.कार्यक्रम यशस्वीतेकरीता सुरेश ताजणे,माया हिंगाणे,रामदास कावडकर,दत्तु काळे,हरीदास कावडकर, गणेश उलमाले,बोरकुटे आदींनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने