Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

तालुकास्तरावर नवरत्न स्पर्धेत यशवंत नगर केंद्र आघाडीवर #chandrapur



चंद्रपूर:- नुकत्याच पार पडलेल्या तालुकास्तरावर नवरत्न स्पर्धेत केंद्रातील ४ स्पर्धेत प्रथम क्रमांक घेऊन जिल्हा स्तरावर सहभागी होणार आहे. केंद्र स्तर ते जिल्हा स्तरावर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यातील सुप्त कला गुण शोधण्यासाठी दरवर्षी नवरत्न स्पर्धा चंद्रपूर जिल्ह्यात आयोजित केल्या जातात.

यशवंतनगर केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील मुत्यालवार यांचे मार्गदर्शनात सर्व शाळेतअसे उपक्रम नियमित राबविले जात आहेत.मार्गदर्शक राजकुमार अंद्रस्कार, संदीप गेडाम, विजय खनके व शिक्षक मित्र खुटाला,सौ.मनीषा वैरागडे,कुमारी धामणकर, माया पस्पूनुरवार,कुमारी पौर्णिमा तागडे,कुमारी केशर मॅडम,पावडे मॅडम व शिक्षक मित्र दाताळा यांचे मार्गदर्शन लाभले तसेच बीट विस्तार अधिकारी श्री धनराज आवारी,गट शिक्षणाधिकारी श्री निवास कांबळे,गट विकास अधिकारी श्री आशुतोष सपकाळ यांनी केंद्रप्रमुख सुनील मुत्यालवार मार्गदर्शक शिक्षक व विद्यार्थी यांचे अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत