चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन मुल-मुली बॉल बॅडमिंटन स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयाच्या संघाने अजिंक्यपद पटकाविले. गोंडवाना विद्यापीठस्तरीय आंतर महाविद्यालयीन बॉल बॅडमिंटन स्पर्धा गडचिरोली येथे आयोजीत करण्यात आली होती.
स्पर्धेकरिता चंद्रपूर व गडचिरोली परिक्षेत्रातील विविध महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सरदार पटेल महाविद्यालयात मुला-मुलींनी अंतिम फेरीत गडचिरोली येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाला पराभूत करून विद्यापीठाचे अजिंक्यपद पटकाविले.
मुलींमध्ये विजयश्री खेचून आणण्याकरिता कु. रानी जितेन्द्र गोंड, कु. संदेशा निकोडे, कु. साक्षी उमाटे, कु. ज्ञानेश्वरी गोनाडे, कु. कोमल मंडल यांनी आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले विजेता संघात कु. चेतना बन्नेवार कु. नेहा भोमळे कु. प्रणाली ईटनकर, कु. लक्ष्मी कामनपल्लीवार, कु. आंचल मुरमुरवार यांचा समावेश होता.
मुलांमध्ये विजयश्री खेचून आणण्याकरिता संजयकुमार लाटकरी, निलेश बन्नेवार, सिद्धांत निमसरकार, मोहित करमाकर यांनी आपल्या सुरेख खेळाचे व कला कौशल्याचे प्रदर्शन केले विजेता संघात भूषण पेकाडे, योगेश डांगरे, दर्शन मेश्राम, सिद्धेश्वर गहुकार, दिपक सोनकर, आदर्श मास्टे यांचा समावेश होता.
संघाच्या या यशाबद्दल सर्वोदय शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा सुधाताई पोटदुखे, कार्यकारी अध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष तथा माजी आमदार सुदर्शन निमकर, सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव तथा गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोलीचे माजी कुलगुरू डॉ. किर्तीवर्धन दिक्षित, सदस्य सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, एस. के. रमजान, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रमोद एम. काटकर, उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, प्रभारी प्रबंधक विनोद चोपावार, शा. शि. विभाग प्रमुख डॉ. विजय ए. सोमकुंवर, डॉ. कुलदीप आर गोंड, हनुमंतु डबारे प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.