थायलंडच्या सेस्टोबॉल स्पर्धेत भंडाऱ्यातील विजयी खेळाडूंचे अभिनंदन #chandrapur #Bhandara

Bhairav Diwase

अंकित भगत व साहील पंचबुध्दे सुवर्ण पदकाचे मानकरी


भंडारा:- भंडारा शहरातील अंकित भगत, साहील पंचबुध्दे यांची पुरुष सेस्टोबॉल भारतीय संघात निवड झाली होती. त्या दोघांनीही टीममधून भारत देशाचे नेतृत्व करत भारताला सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या या उत्कृष्ट कामगिरीने भंडाराकरांची मान उंचावली आहे.

थायलंड सेस्टोबॉल फेडरेशन 2022 तर्फे आंतरराष्ट्रीय सेस्टोबॉल स्पर्धा २ ते ५ डिसेंबर या कालावधीत थायलंड येथे पार पडली. या स्पर्धेसाठी अंकित भगत, साहील पंचबुध्दे यांची पुरुष सेस्टोबॉल स्पर्धा भारतीय संघात निवड करण्यात आली होती. भारतविरुद्ध थायलंड संघासोबत अंतिम स्पर्धा पार पडला. या स्पर्धेत दोघांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला सुवर्ण पदक पटकावून दिले.

दोघांचे भंडारा आगमन झाल्यानंतर सेस्टोबॉल असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष विवेक यादवराव पडोळे, सचिव बेनीलाल चौधरी, अजित आस्वले डॉ. प्रकाश सिंग, राजेश गेडाम, पंकज सारवे, विवेक रेहपाडे, संजय दमाहे, मंगेश तितीरमारे, गौरव भुरे, सचिन कांबडे, दिपांशू खटके यांनी अंकित भगत व साहील पंचबुध्दे या खेळाडूंचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले.