विसापूरच्या चिमुकल्याला सुधीरभाऊंनी दिला मदतीचा हात #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase
0


बल्लारपूर:- शिवम पंकज सिडाम या नऊ महिन्याच्या बाळाच्या हृदयाला होल (छिद्र) असल्याचे समजतात पंकज सिडाम यांनी श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार जनसेवा केंद्र बल्लारपूर येथे धाव घेतली व मदतीची विनंती केली असता भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी त्वरित नेहमी जनतेच्या हाकेला धावून जाणारे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना या विषयाची सविस्तर माहिती दिली. त्यानंतर बाळाचे त्वरित इलाज करण्याचे निर्देश भाऊंनी दिले.

श्री सागर खडसे यांनी त्वरित मुंबईच्या दवाखान्यात ऑपरेशनची व्यवस्था उभी करून योजनेच्या माध्यमातून जवळपास एक लाख वीस हजार खर्च करून ऑपरेशन झाले व शिवम हे बाळ सुखरूप घरी परतले. पालकमंत्री सुधीर भाऊंनी केलेल्या या मदत कार्याबद्दल पंकज सिडम यांनी भाऊंचे आभार मानले. तसेच या मदत कार्यात भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष संदीप पोडे यांचे सुद्धा सहकार्य लाभले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)