सात दिवसापासून बिबट्याची वनविभागाला हुलकावणी #chandrapur #pombhurna

Bhairav Diwase
0

८ ट्रप कॅमेरे, २५ वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व एक पिंजरा बिबट्याच्या बंदोबस्तासाठी

बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पोंभूर्णा वनविभागाची चोवीस तास गस्त


पोंभूर्णा:- पोंभूर्णा वनपरीक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या बोर्डा झुल्लूरवार शेतशिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे एकामागे एक झालेल्या घटनांमुळे परिसरात खळबळ माजली आहे.एक महिण्याच्या अंतरात गावानजीक घटना घडल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.सदर घटनेमुळे सतर्कता ठेवत पोंभूर्णा वनविभाग ॲक्शनमोडवर असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी चोवीस तास गस्त, ट्रप कॅमेरे व पिंजरा लावून उपाययोजना केल्या जात आहे.

देवाडा खुर्द बिटातील बोर्डा झुल्लूरवार गावातील जिल्हा परिषद शाळेच्या बाजुला असलेल्या गोठ्याजवळ काम करीत असताना बिबट्याने शेतकऱ्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना ४ डिसेंबरला घडली.याच परिसरात एक महिण्या अगोदर बिबट्याने शेतकरी व वनकर्मचाऱ्यावर हल्ला करून गंभीर जखमी केले होते.सदर घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. यावर ठोस उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती.

८ ट्रप कॅमेरे,२५ वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी व एक पिंजरा बिबट्याच्या बंदोबस्तासाठी

बिबट्याच्या वावर क्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी ८ ट्रॅप कॅमेरे बसविण्यात आले असुन बिबट्याच्या बंदोबस्तासाठी २५ वन अधिकारी व कर्मचारी २४ तास गस्त घालत आहेत. पोंभूर्णा वनविभागाने बिबट्याच्या बंदोबस्तासाठी कंबर कसली असून वनविभाग ॲक्शन मोडवर आहे. बिबट्याचे पगमाॅर्क शोधले जात आहेत तर ट्रप कॅमेरेतून बिबट्याचे लोकेशन तपासल्या जात आहेत.
बिबट्याच्या जेरबंद करण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी फणिंद्र गादेवार, क्षेत्र सहाय्यक आनंदराव कोसरे, वनरक्षक प्रशांत शेंडे, दुषांत रामटेके, सुरेंद्र देशमुख व वनकर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)