पोलिस भरतीसाठी युवकांची तयारी सुरू #police #policebharati

Bhairav Diwase


चंद्रपूर:- पोलिस भरती प्रक्रियेला सुरुवात झाल्याने युवकांनी तयारी सुरू केली आहे. पोलिस भरतीची जाहिरात प्रसिद्ध होताच मैदाने पुन्हा गजबजली आहेत. मागील तीन वर्षे भरतीच झाली नव्हती. दरम्यान, राज्य शासनाने प्रथम घोषणा केली. त्यानंतर पुन्हा स्थगिती आणली. यामुळे युवकांचा हिरमोड झाला होता. मात्र, शासनाने निर्णय घेत भरतीचा निर्णय घेतल्याने काही प्रमाणात का होईना युवकांना दिलासा मिळाला आहे. ६ नोव्हेंबरला पोलिस भरतीची जाहिरात निघाल्याने अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या असून, अनेकांनी तयारी सुरू केली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील युवकांनी तयारी केली आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात युवक पहाटेपासून मैदानी खेळासाठी तयारी करीत आहे, तर काहींनी शहरात येऊन अभ्यासालाही सुरुवात केली असून, भरतीतील बारकाव्यांकडे विशेष लक्ष देणे सुरू केले आहे.