Top News

‘गावात खुन झाला आहे…’ अशी खोटी माहीती डायल ११२ वर देणाऱ्याला मिळाली जेलची हवा… #chandrapur #ahmadnagar #policeअहमदनगर:- अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील वरखेड गावामध्ये खुन झाला आहे, अशी खोटी माहीती २६ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजून ४९ मिनीटांनी नेवासा पोलीसांना डायल ११२ वर एका इसमाने दिली होती. यानंतर घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचारी दाखल झाले असता असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे पोलीसांना समजले. त्यानंतर डायल ११२ वर खोटी माहीती देणाऱ्या तुकाराम बाबुराव गोरे (वय – २९ वर्षे) रा. वरखेड (ता.नेवासा) याच्या विरुध्द नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलीसांना खोटी माहीती देवून पोलीसांची हाकनाक धावपळ उडवून देणाऱ्या गोरे या युवकाला जेलमध्ये बसण्याची वेळ आली आहे.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, रामडोह (ता.नेवासा) येथील तुकाराम बाबुराव गोरे (वय – २९) या इसमाने भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सकाळीच पोलीस नियंञण कक्षाला डायल ११२ वर कॉल करुन वरखेड गावामध्ये खुन झाला आहे अशी माहीती दिली. त्यानंतर लगेचच नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक विजय करे यांनी मिळालेल्या माहीतीवरुन पोलीस उपनिरिक्षक मोंढे, पोलीस नाईक संजय माने, पोलीस नाईक अशोक कुदळे असे पोलीस पथक घटनास्थळी रवाना केले.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस पथकाला वरखेड (ता.नेवासा) येथे गेल्यावर सदर इसमाचे नांव तुकाराम गोरे व तो रामडोह येथील असल्याबाबत अधिक माहती मिळाली. यानंतर पोलीस रामडोह येथील कॉल करून खून झाल्याची माहिती देणाऱ्या तुकाराम गोरे याच्या राहत्या घरी गेले. पोलीस त्याच्या घरी गेले असता तेथे कोणत्याही प्रकारचा खुन अथावा गुन्हा घडलेला नसल्याचे समजले. तेथील घरी हजर असलेल्या इसमास पोलिसांनी ओळख विचारली असता त्याने त्याचे नांव तुकाराम बाबुराव गोरे असे सांगितले.

तुकाराम गोरे याच्या तोंडाचा आंबट व उग्र वास येत होता. त्यास डायल ११२ च्या कॉलबाबत विचारपुस केली असता त्याने ‘मी कॉल करून खोटी माहिती दिली’ असे सांगितले. त्यानंतर गोरे हा दारुच्या नशेत असल्याने त्यास पोलीसांनी ताब्यात घेवून त्याची वैद्यकीय तपासणी केली. त्यावेळी तो दारुच्या नशेत असल्याबाबतचे वैद्यकिय प्रमाणपत्र पोलीसांना मिळाले. खोटी माहीती दिल्याने गोरे या युवकाला जेलची हवा मिळाली आहे.

तालुक्यातील सुजान नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, पोलीस खात्याच्या डायल ११२ या प्रणालीवर अचडणीच्या वेळीच कॉल करण्यात यावा. त्याचबरोबर डायल ११२ या प्रणालीवर खोटी माहीती देवून दिशाभुल करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील याची दक्षता घ्यावी.
विजय करे, पोलीस निरिक्षक, नेवासा.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने