Top News

चक्क वाघाच्या अधिवासात पार्टी करणे महागात पडले #chandrapur


चंद्रपूर:- ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील मोहर्ली पद्मापूर मार्गाने जाताना दोन चारचाकी वाहने ताडोबा बफर सफरीच्या रस्त्यावर थांबली. त्यातील पर्यटक खाली उतरून मोठ्या आवाजात गाणी लावून पार्टी करत असल्याचे स्थानिक पर्यटक मार्गदर्शक व जिप्सी चालकाच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात माहिती दिली.

वनविभागाची चमू तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. ज्या परिसरात भर दिवसा वाघ रस्त्याने चालताना दिसतो, आशा संवेदनशील परिसरात वाहनाखाली उतरून मोठमोठ्याने गाणी वाजवून पार्टी करणे म्हणजे वाघाच्या तोंडी आयता घास देण्यासारखे आहे.

या घटनेत वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या या वाहनचालकांकडून पाच हजार रुपये दंड आकारला व त्यांना जंगलाबाहेर काढण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने