Top News

चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुलांचा तलावात मृत्यू #chandrapur #Korpana #death

"त्या" तीनही मुलांचे सापडले मृतदेह


कोरपना:- अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरातील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य सापडले आहे. मुलांचा शोध घेणे सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. त्यामुळे रात्री शोध मोहिम थांबवण्यात आली होती.

आज दिनांक 27 रोज शुक्रवारला पोलीस प्रशासनाच्या वतीने चंद्रपूर येथून रेस्क्यू टीम बोलावण्यात आली त्यांच्या माध्यमातून अवघ्या दोन तासामध्ये तळ भागाशी असलेल्या गाळात दडून असलेल्या तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सचिन गोवारदिपे वय 10 वर्ष, दर्शन शंकर बचाशंकर वय 10 वर्ष व अर्जुन सुनील सिंग 10 वर्ष असे मृतक मुलांची नावे आहे.
पुढील तपास गडचांदूर चे पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक SDPO यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सत्यजित आमले, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, जमादार संदीप अडकिने व त्यांचे सहकारी करीत आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने