Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

इन्स्टाग्रामवर स्टेटस ठेवल्यावरुन कॉलेजमधील दोन गटात हाणामारी #chandrapur #pune #Instagramपुणे:- उरुळी कांचन येथील पद्मश्री मनीभाई देसाई जुनियर कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये इंस्टाग्रामवर ठेवण्यात आलेल्या स्टेटसवरून तुंबळ हाणामारी झाली. या विद्यार्थ्यांनी लोखंडी स्टिक, लाकडी दांडके अशा हत्यारांनी एकमेकांना बेदम मारहाण केली. दोन्ही गटांविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यामध्ये परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी (दि.24) सकाळी दहा वाजताच्या सुमारास कॉलेजमधील पार्किंग परिसरात घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही गटातील विद्यार्थी बारावीमध्ये शिकतात. दोन्ही गटातील फिर्यादी तरुणांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एकमेकांना खिजवणारे स्टेटस ठेवलेले होते. या स्टेटस संदर्भात एकमेकांना आक्षेप होते. या स्टेटस बाबत कॉलेजच्या पार्किंगमध्ये एकमेकांना जाब विचारला. त्यावेळी त्यांच्यामध्ये वादावादी झाली. या वादाचे पर्यावसन काही वेळातच मारहाणीमध्ये झाले. दोन्ही गटातील एकूण 11 विद्यार्थ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये बहुतांश आरोपी अल्पवयीन आहेत, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक अमित गोरे यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत