Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

प्रजासत्ताक दिनी उत्कृष्ट सर्जन म्हणून डॉ. संदेश मामीडवार सन्माननीत #chandrapur #pombhurna


पालकमंत्री मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले सन्मान


पोंभूर्णा:- राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंतर्गत चंद्रपूर जिल्ह्यातील उत्कृष्ट सर्जन म्हणून पोंभूर्ण्याचे तालुका आरोग्य अधिकारी तथा पोंभूर्णा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संदेश मामीडवार यांना प्रजासत्ताकदिनी मंत्री वने,सांस्कृतिक कार् व मस्यव्यवसाय तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी,मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती.
भारत सरकारने देशाच्या वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी कुटुंब कल्याण कार्यक्रम हा एक महत्वाकांक्षी उपक्रम सुरू केला यातून लोकसंख्येवर आळा घालणे, कुटुंबातील संख्या मर्यादित ठेवणे तसेच माता व बालकांचे आरोग्य निरोगी ठेवणे आहे.पोंभूर्णा तालुक्यातील डॉ.संदेश यांनी स्वतःच्या तालुक्याचे, प्राथमिक केंद्राचे काम सांभाळून इतरही तालुक्यातील प्रा.आ.केंद्रामध्येही कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे काम यशस्वीरित्या पूर्ण केले.

सन २०१८-१९ पासून डिसेंबर २०२२ पर्यंत डॉ.संदेश मामीडवार यांनी प्रा. आ. केंद्र पोंभूर्णा, नवेगाव मोरे, बोथली, पाथरी, जिबगाव, मारोडा, चिरोली, राजोली, चिचपल्ली, घुग्घुस, ताडाळी, दुर्गापूर, विसापूर, कोठारी, चंदनखेडा, मुधोली, डोंगरगाव, घोडपेठ, अंतरगाव, उपजिल्हा रुग्णालय मूल येथे एकूण ३२२७ कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केले. मुख्यता त्यांनी कोरोना काळातही केलेले कुटुंब नियोजन हे प्रशंसनीय होते. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना उत्कृष्ट सर्जन म्हणून गौरविण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत