चंद्रपुरात तीन अल्पवयीन मुले तलावात बुडाले? #chandrapur #Korpana

Bhairav Diwase

बचाव पथकाकडून शोध सुरु



चंद्रपूर:- अल्ट्राटेक सिमेंट कंपनी परिसरातील नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या 3 मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोरपना तालुक्यातील ही घटना आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहचले आहे.

घटनास्थळावर पोलिसांना मुलांचे कपडे व इतर साहित्य सापडले आहे. मुलांचा शोध घेणे सुरू आहे. रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम राबवण्यात आली. अंधार झाल्याने बचाव पथकाला अडचण येत होती. त्यामुळे रात्री शोध मोहिम थांबवण्यात आली होती.

 काल शोध मोहीम केली परंतु मुले सापडली नाही त्यामुळे आज पहाटेपासूनच पुन्हा शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. हे तिन्ही मुले दहा वर्षाची आहेत आणि एकच वर्गात शिकत असल्याची माहिती आहे.