Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

ॲड. राहुल अजाबराव थोरात; एक साधं व्यक्तीमत्व #chandrapur #article


आधार न्युज नेटवर्कचे मुख्य उपसंपादक तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकाशर संघाचे राजुरा तालुका अध्यक्ष ॲड. राहुल दादा थोरात यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा....


ॲड. राहुल अजाबराव थोरात हे नाव आता चंद्रपूर जिल्ह्यातल्या पत्रकारीतेत एक परिचयाचे नाव झाले आहे. राहुल दादा मागील काही वर्षांपासून चंद्रपूर समाचार या दैनिक पेपरला राजुरा शहर प्रतिनिधी म्हणून काम करतोय. त्यांनतर राहुल दादा जुलै २०२० ला आधार न्युज नेटवर्क या न्युज पोर्टल मध्ये राजुरा तालुका प्रतिनिधी म्हणून काम करु लागला. मागील अडीच वर्षापासून आधार न्यूज नेटवर्क च्या माध्यमातून पत्रकारीतेत सक्रीय झालेल्या राहुल दादाला आधार न्युज नेटवर्क च्या मुख्य उपसंपादक पदाची जबाबदारी दिली. व त्यांनी दिलेली जबाबदारी स्वीकारून आधार न्युज नेटवर्क च नावं जिल्हाभरचं नाही तर महाराष्ट्रात चर्चेत ठेवलं. राहुल दादा सहकार्यही खुप लोकांचे लाभले. याला कारणीभूत तोच व त्याच्यातील शिकण्याची जिद्द. म्हणूनच अनेकांचा त्याला "आधार" मिळाला.

23 व्या वयात राहुलची पत्रकारीतेत एन्ट्री झाली. सुरूवातीला भिती होती खरी, पण निडर असलेल्या राहुल दादाच्या भितीचा बाऊ फार जास्त काळ अडून राहिला नाही.

शहरातील समस्यांपासून त्यांनी आपल्या बातम्याची पहिली सुरूवात केली. हळूहळू आजुबाजुच्या गावातून, शहरातून, बातम्या दैनिक चंद्रपूर समाचार पेपरला सुरू केल्या. त्यानंतर त्यांनी आधार न्युज नेटवर्क पोर्टलशी जुळला व पोर्टलवर बातम्या देऊ लागला. आणि तो हळूहळू तालुक्यातच नाही तर जिल्हाभर परिचीत झाला. तो प्रत्येक राजकीय पक्षातील स्थानिक नेत्यांशी त्याचे फार चांगले संबंध आहेत. व ते प्रत्येकच राहुल दादाला आपलंसा समजतात हि मिळकत फार कमी लोकांना मिळते.

राहुल दादा हा राजुरा तालुक्यातला.... त्याला तालुक्यातील समस्या, शेतकऱ्यांच्या समस्या, गरिबांच्या समस्या या समस्या त्यांनी खुप जवळून पाहिलेला असल्याने. आणि असे समस्या तो वृत्तपत्रात बघत असल्यानेच तो त्याच्या वृत्त वाचण्यातूनच अप्रत्यक्षरित्या पत्रकारतेशी जुळत गेला. पण यात प्रत्यक्ष जुळायचे कसे, समस्या मांडायचे कसे असले प्रश्न त्याला नक्कीच पडले. मात्र काही तरी मिळवण्याची जिद्द यामुळे पत्रकारितेच्या क्षेत्रात असलेल्या लोकांशी तो संपर्क साधू लागला.


आज आधार न्यूज नेटवर्कचं काम महाराष्ट्र तर सुरू आहेच. पण जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यशस्वीपणे सुरू आहे. आधार नेटवर्कने १ कोटी ११ लाख ७९ हजार ६१८ वाचकांचा टप्पा पुर्ण केलेला आहे.

आजमितीला आधार सोबत ११ सुशिक्षित व निडर पत्रकारांची साथ आहे. आणि ॲड. राहुल थोरात सारखा जाणता पत्रकार मुख्य उपसंपादक म्हणून आधार न्युज नेटवर्क च्या साथीला आहे.
     
    राहुल नेहमी बोलतांना म्हणतो की १ कोटी वाचकांपर्यंत आधार पोहचलं तर आपल्या कामाचं चिज होईल. हा विश्र्वास नक्कीच सार्थकी लागला. आधार न्युज नेटवर्क ने १ज्ञकोटीचा टप्पा पार केला आहे. 
             
       राहुल पत्रकारितेसोबतच बी.ए., एम.एम.सी, ( M.A mass communication) एल.एल.बी. शिक्षण पुर्ण केले. राहुल आपल्या शालेय शिक्षणात पत्रकारितेची सळमिसळ करित नाही. म्हणूनच तो आपलंसं वाटतो. तो प्रत्येक फ्रेम मध्ये आपलं वेगळेपणा जपून असतो. राहुल दादा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा राजुरा तालुका अध्यक्ष म्हणून काम करीत आहे.
       

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत