चंद्रपूर पोलिसांची मोठी कारवाई #chandrapur #police

३ किलो गांजा जप्त

चंद्रपूर:- नवीन वर्षाच्या पूर्व संध्येला चंद्रपूर पोलिसांनी मोठी कारवाई करुन ३ किलो गांजा जप्त केला आहे. पडोली परिसरातील दोन घरात धाड टाकून ३२ हजार रुपयांचा ३ किलो २०० ग्रॅम गांजा स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकत जप्त केला.


या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शेख मेहबूब हसन, राणी झा असे आरोपीचे नाव असून दोघंही पडोलीतील रहिवाशी आहेत. या कारवाईने अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.ही कारवाई स्थानिक गुन्हेचे पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र बोबडे, बलकी, स्वामी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत