सुंदर माझे कार्यालयाचे द्वितीय पुरस्काराने पोंभूर्णा पंचायत समिती सन्माननीत #chandrapur #pombhurna


गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोले यांनी स्विकारला सन्मान


पोंभूर्णा:- प्रत्येक कार्यालय स्वच्छ सुंदर व निटनिटके असावे येथील वातावरण नागरिकांसाठी सुलभ व कर्मचाऱ्यांनी काम करण्यायोग्य,प्रेरक, उत्साहवर्धक असावे यासाठी राज्यस्तर ते तालूका स्तरावर सुंदर माझे कार्यालय अभियान राबविण्यात आले. यात उत्कृष्ट कार्यालयाचा जिल्हास्तरीय द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार पोंभूर्णा पंचायत समितीला सांस्कृतिक कार्य,वन व पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले यांनी प्रजासत्ताक दिनी चंद्रपूर येथे स्विकारला.यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन, जिल्हा पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेसी,मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांची उपस्थिती होती.

शासनस्तरावरून राबविण्यात आलेल्या अभियानात कार्यालयीन स्वच्छता व अनुषंगिक बाबी,प्रशासकीय कार्यपद्धतीचे सुलभीकरण,कर्मचारी लाभ विषयक बाबी याचा अभियानासाठी विचार करण्यात आला होता.
कार्यालय हे स्वच्छ सुंदर असावे, नागरिकांना कार्यालयाचे वातावरण सुलभ वाटावे व त्यांचे महत्वाचे कामे तातडीने पूर्ण व्हावे यासाठी पोंभूर्णा पंचायत समितीने नेहमीच पुढाकार घेतला.यात कार्यालय स्वच्छ सुंदर ठेवण्यावर भर देण्यात आले,भिंतीवर पोंभूर्णा तालुक्यातील महत्वाची स्थळे चित्रीत करण्यात आलीत, अभ्यांगतासाठी विशेष कक्ष, वाचण्याची आवड वाढावी यासाठी कार्यालयात कर्मचाऱ्यांसाठी वाचनालय,
नोटीस बोर्डवर योजना सुचनेचे फलक लावणे,एक कर्मचारी एक वृक्ष हि संकल्पना कर्मचारी वज्ञअधिकाऱ्यांच्या सहका-र्याने राबवण्यात आली.आदी कामे पंचायत समितीने केले.पंचायत समितीचे कार्यपद्धतीची दखल घेत सुंदर माझे कार्यालयाचे जिल्ह्यातून द्वितीय पुरस्काराने पोंभूर्णा पंचायत समितीचे गौरव करण्यात आले.

पोंभूर्णा पंचायत समिती सुंदर कार्यालयाच्या अनुषंगिक बाबी पूर्ण करण्यासाठी तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मिताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जाॅन्सन,उप मुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन श्याम वाखर्डे,उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत कपील कलोडे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर यांचे मार्गदर्शन लाभले.तर
माजी जिल्हा परिषद सदस्य देवराव भोंगळे,माजी पंचायत समिती सभापती अलका आत्राम,माजी उपसभापती ज्योती बुरांडे,सदस्य विनोद देशमुख,गंगाधर मडावी यांचे सहकार्य होते.

तर अभियान यशस्वीपणे राबविण्यासाठी पोंभूर्णा पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी सुनीता मरस्कोले,सहा.प्रशासन अधिकारी किरण वाढई,कनिष्ठ प्रशासन अधिकारी रश्मी पुरी,सहा.लेखा अधिकारी नितीन शस्त्रबुध्दे, कनिष्ठ प्रशासन अधिकारी सुनील कळसकर,गट शिक्षणाधिकारी अर्चना मासीरकर,बाल विकास अधिकारी अमित लाडे तसेच अधिकारी,कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत