Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

जन सामान्यापर्यंत संविधान पोहचविण्याचा संकल्प

जनहित फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम 


सिंदेवाही:- तालुक्यात कार्यरत जनहित फाऊंडेशनच्या माध्यमातून 74 प्रजासत्ताक दिन तथा संविधान अंमलबजावणी दिन साजरा करण्यात आला.त्याचप्रमाणे याप्रसंगी भारतीय संविधान प्रास्ताविकेची प्रत गावातील ग्रा.पं.सरपंच,पोलीस पाटील,विविध समित्यातील पदाधिकारी,सदस्य,प्रतिष्ठीत नागरिक,शासकीय अधिकारी तसेच युवकांना वितरीत करण्यात आली.यावेळी जनहित फाऊंडेशनने समस्त जनसामान्यांना पर्यंत भारतीय संविधान  पोहचविण्याचा संकल्प केला आहे.तसेच संविन्धानिक विचार हे प्रत्येक नागरिकांच्या मनात रुजविण्यासाठी जनहित फाऊंडेशन सक्रिय राहणार असल्याचे जनहित फाउंडेशनचे समस्त उपस्थित पदाधिकारी सदस्यांकडून सांगण्यात आले

.या उपक्रमासाठी आक्रोश खोब्रागडे,अध्यक्ष ज.फा.वा,विशाल गेडाम,उपाध्यक्ष ज.फा.वा,तथागत कोवले, सचिव ज.फा.वा,विरेंद्र मेश्राम कोशाध्यक्ष,ज.फा.वा,किशोर बोरकर,सदस्य ज.फा.वा,रितेश सूर्यवंशी  सदस्य ज.फा.वा,सत्यपाल मेश्राम सदस्य ज.फा.वा हे उपस्थित होते.तसेच याकरिता मा.हेमंत सूर्यवंशी,उपकार खोब्रागडे,कविश कोवले,श्रीकांत शेंडे, प्रजय कोवले आदींचे सक्रियतेने उपक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत