Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

ताडोबा व्याघ्र प्रकल्पात तारू आणि पारस या दोन वाघांची झुंज #chandrapur #tigerचंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वन्य प्राण्यांचे दर्शन सध्या पर्यटकांना चांगलंच होत आहे. यातच वाघांचही दर्शन सातत्याने होत आहे.


ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील मोहर्ली झोनच्या आगरझारी बफर क्षेत्रात सोमवारी काही पर्यटकांनी वाघाच्या झुंजीचा थरार अनुभवला. तारू आणि पारस या दोन वाघांनी हद्द आणि छोटी मधू या वाघिणीसाठी केलेल्या या झुंजीचा थरार पर्यटकांनी व्हिडिओ कैद केलं. तर मोहर्ली बफर वन परीक्षेत्र अधिकारी संतोष थिपे यांनी माध्यमाकडे उपलब्ध करून दिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत