Top News

वाघासोबतच्या झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू #chandrapur


संग्रहित छायाचित्र

चंद्रपूर:- तळोळी बाळापूर वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गोविंदपूर वनक्षेत्रातील येनोली माल बिट कक्ष क्रमांक ६५ मध्ये मादी बिबट मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली. वाघासोबतच्या झुंजीत मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वनाधिकाऱ्यांनी वर्तवला आहे.

तळोधी बाळापूर वनपरिक्षेत्रातील येनुली मालचे वनरक्षक श्रीरामे गुरुवारी सकाळी गस्तीवर असताना कक्ष क्रमांक ६५ मध्ये अंदाजे दीड ते दोन वर्षे वयाची मादी बिबट मृतावस्थेत आढळून आली. वाघासोबतच्या झुंजीत तिचा मृत्यू झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मौका पंचनामा केल्यानंतर पशुधन विकास अधिकारी ममता वानखेडे, पशुधन विकास अधिकारी एस.बी. बनाईत यांनी शवविच्छेदन केले.

मृत बिबट्याचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात येणार असून अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. यावेळी सहायक वनसंरक्षक के.आर. धोडने, वनपरिक्षेत्राधिकारी एस.बी. हजारे, क्षेत्र सहायक एक.बी. वाळके, गायकवाड, मानद वन्यजीव रक्षक विवेक करंबेकर यांच्यासह वनरक्षक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने