ढिवर (भोई) समाजातील तरुणाईने सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटवा:- गुरुदास कामडी #chandrapurचंद्रपूर:- ढिवर (भोई) समाज हा अतिशय कष्टाळू आहे. लोकांना अन्न मिळावे म्हणून लोकांचा अन्नदाता म्हणून काम करत होता. लोकांच्या अन्नाची गरज पूर्ण करणारा हा माझा समाज स्वतःला अन्न मिळावे म्हणून दारोदार भटकत आहे. अशिक्षित व दारिद्रयामूळे यांच्या आयुष्यात अंधकार निर्माण झाला आहे. हा अंधकार दूर करण्यासाठी ढिवर (भोई) समाजातील तरुण-तरुणींनी शैक्षणिक क्रांतीची मशाल पेटविली पाहिजे असे आवाहन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी केले.
महर्षी वाल्मिकी ढिवर (भोई) समाज मंडळ नवरगांव च्या वतीने ढिवर (भोई) समाज प्रबोधन मेळावा व महर्षी वाल्मिकी महोत्सव सोहळ्याचे आयोजन दिनांक ८ जानेवारी २०२३ रोज रविवारला नवरगाव येथे करण्यात आलेले होते. या कार्यक्रमाचे उद्घघाटन माजी न्यायमूर्ती तथा राज्य मागासवर्ग मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष चंद्रलालजी मेश्राम व प्रमुख अतिथी यांच्या हस्ते महर्षि वाल्मिकी, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, स्वामी विवेकानंद, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीपप्रज्वलनाने कार्यक्रमची सुरुवात झाली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा भोई समाज सेवा संघ अध्यक्ष कृष्णाजी नागापुरे आमदार विजय वडेट्टीवार, श्री प्रकाश डायरे संशोधन अधिकारी , गुरदास कामडी अधिसभा सदस्य गोंडवाना विद्यापीठ, प्रा. राजेश डाहरे,गजाननराव चाचरकर उमाताई डहारे, सुवर्णा कामडे,मिनाक्षीताई मेश्राम, राहुल बोडणे, सरपंच, रमाकांत लोधे माजी सदस्य जिल्हा परिषद यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

भोई(ढिवर) समाजात जागृती निर्माण करायची असेल तर समाजातल्या तरुण युवकांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात समोर आले पाहिजे. जोपर्यंत भोई समाज हा राजकीय राजकीय दृष्ट्या जागृत होत नाही तोपर्यंत समाजाची प्रगती होऊ शकत नाही. आणि म्हणून समाजाचे प्रबोधन करुन समाज संघटित झाला पाहिजे. असे आवाहन उपस्थितीत मान्यवरांनी केले.
राज्य मागासवर्गीय आयोगाच्या अध्यक्षपदी माजी न्यायामुर्ती चंद्रलालजी मेश्राम , सिनेट सदस्य गुरुदास कामडी यानी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली सिनेट निवडणूकीत विजय प्राप्त करुन भोई (ढिवर) समाजाला प्रतिनिधित्व मिळवून दिल्याबद्दल उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मान पत्र देऊन जाहीर सत्कार करण्यात आला.
भोई(ढिवर) समाजात जागृती निर्माण करायची असेल तर समाजातल्या तरुण युवकांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक अग्रेसर राहिले पाहिजे. भोई समाजाने आपल्या राजकीय अधिकार आणि हक्कासाठी संघटित होऊन संघर्ष केला पाहिजे. असे आवाहन गुरुदास कामडी यांनी केले.
याच मेळाव्यात भोई समाजातील सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आणि १० व१२ वी तील गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांचा उपस्थित मनोहर शेन्डे, गणपत कामडी, नामदेव मेश्राम, छबुताई शेन्डे,राजू मेश्राम, भिकाजी शेन्डे, अमोल ठाकरे
यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश कामडी व प्रस्ताविक नामदेव मेश्राम यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत