गेवरा बुज येथे दातांच्या दवाखान्याचे उद्घाटन #chandrapur #Saoli


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) सौरभ चौधरी, सावली
सावली:- तालुक्यातील गेवरा बु. येथे सोबत फाऊंडेश, चंद्रपूरच्या जाणीव रुग्णालयाला दोन वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी दातांच्या रुग्णालयाचे व प्रयोगशाळेतील बायोकेमिस्ट्री यंत्राचे उद्घाटन सुमन देशमुख या ज्येष्ठ महिला रुग्णाच्या हस्ते पार पडले.

उदघाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव पूनम झाडे, तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष डॉ. सूरज म्हस्के, डॉ. जानकी गुरपुडे म्हस्के, पोलिस पाटील संजय रामटेके, आखा गटप्रवर्तक वर्षा भांडेकर यांची उपस्थिती होती.

याप्रसंगी तीन दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात पहिल्या दिवशी दातांच्या दवाखान्याचे व प्रयोगशाळेतील बायोकेमिस्ट्री यंत्राचेउद्घाटन प्रा. संजय बन्सोडे प्रधान सचिव अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे महाराष्ट्र राज्य प्रधान सचिव प्रा. संजय बन्सोडे यांच्या हस्ते झाले. यावेळी सुयश तोशनिवाल, डॉ. राधिका शर्मा यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी मोफत मोतीबिंदू व नेत्रचिकित्सा शिबिर घेण्यात आले. यामध्ये २३१ रुग्णांनी नोंदणी केली. त्यात २१७ रुग्णांची तपासणी नेत्रचिकित्सक डॉ. सागर राजुरकर यांनी केली. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात शालेय विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला तिसऱ्या दिवशी सकाळी रांगोळी स्पर्धा व महिलांसाठी कबड्डी व खो-खो खेळाचे आयोजन करण्यात आले होते. खो-खोमध्ये गेवरा बुज, तर कबड्डीमध्ये रामनगर संघांनी जेतेपद प्राप्त केले. त्यानंतर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती डॉ. जानकी गुरपुडे -म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली, तर डॉ. सूरज म्हस्के, रिना दाजगाये, रश्मी सायरे, शारदा श्रीरामे, वनिता पांचलवार, सविता लोणारे आदींच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी विजयी संघाना चषक व पदक देण्यात आले.

तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र, पुस्तिका व भेटवस्तू देण्यात आल्या.
प्रास्ताविक डॉ. सूरज म्हस्के यांनी केले. संचालन विवेक राऊत यांनी, तर आभार किर्ती पिंगे हिने मानले, यशस्वितेसाठी सोबत फॉऊंडेशनचे कार्यकर्ते, समन्वय समितीचे सदस्य गुरुदेव शेंडे, अजय भांडेकर, शिल्पा पाल, रमेश वाकडे, विनायक वाढणकर, अनिता मारभते, गिरीधर मारभते, प्रज्योत आभारे यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत