सामाजिक चळवळीत महिलांचे योगदान महत्त्वाचे:- डॉ. मंगेश गुलवाडे #chandrapur

Bhairav Diwase
0

आता खऱ्या अर्थाने महिलांनी सक्षमीकरण व सामाजिक चळवळीत सक्रिय व्हावे:- प्रा. डॉ. माधवी भट

चंद्रपूर:- समाजाच्या प्रगतीसाठी महिलांचे संघटन आवश्यक आहे. महीला आज प्रत्येक क्षेत्रात सक्षम असून त्यांना फक्त पाठबळ देण्याची गरज आहे. महिलांनी सुध्दा आपल्या संसाराच्या गाडा पुढे रेटत असतांना समाजात सर्वतोपरी योगदान देण्यास तत्पर राहील्या पाहिजे, पुण्यश्लोक अहील्याबाई होळकरांनी केलेल्या कार्याचा वसा महिलांनी घेतला पाहिजे असे प्रतिपादन अध्यक्षीय मनोगतातून डॉ मंगेश गुलवाडे यांनी केले.

धनगर जमात सेवा मंडळ, चंद्रपूर पुरस्कृत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला मंच चंद्रपूर व्दारा "हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभ"रविवार, दिनांक २२/०१/२०२३ ला दुपारी १२.०० वाजता स्थानीक खेडूले कुणबी समाज भवन एस. टी. वर्कशॉप चौक, अयप्पा मंदिर रोड,तुकूम, चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आले होते. दीप प्रज्वलन करून व पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरूवात झाली.


  सादर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे हे होते तर कार्यक्रमाच्या उद्घाटिका मान. प्रा. डॉ. माधवी भट सुप्रसिद्ध नाट्य अभिनेत्री हे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून स्त्री रोगतज्ञ डाॅ. कल्पना गुलवाडे. डॉ. धनश्री मर्लावार (अवघड), सोनाली करेवार, प्रमुख उपस्थिती डॉ. संगिता पोतले,मान वंदना उपासे, डॉ. ज्योती कन्नमवार आदी उपस्थित होते.
🖼️

        उद्घाटिका म्हणून मान. प्रा. डॉ. माधवी भट यांनी महिला नेहमी दुहेरी भूमिका बजावत असून घरातील लहान सहान गोष्टींकडे त्यांचे बारकाईने लक्ष असते. त्याच वेळी समाजात घडणाऱ्या घटनांकडे त्यांचे सूक्ष्म निरीक्षण असते. तसेच त्यांचे परिस्थिती हाताळण्याचे कौशल्य वाखावण्याजोगे असून त्या वेगवेगळ्या आघाडी एकाचवेळी सांभाळू शकतात असे मनोगतातून व्यक्त झाले.

       महीलांनी प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेऊन काम केला पाहीजेत,समाजाच्या चळवळीत आपला योगदान दिले पाहिजे.महीलांनी फक्त चुल आणि मुल न सांभाळता समाजकार्यात अग्रेसर झाले पाहिजे. आज सामाजिक तसेच राजकीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. त्यामुळे समाजाचा एक घटक म्हणून महिलांची सुध्दा नैतिक जबाबदारी आहे की त्यांनी पुरुषांच्या बरोबरीने उभे राहून आपले योगदान दिले पाहिजे.तेव्हाच सनाजिक बदलाचे विपरीत परिणाम आपल्यावर होणार नाही. ज्या पध्दतीने सर्व महीला आज एकत्रित आले त्याच पद्धतीने समाज्याच्या अडीअडचणीच्या वेळी आपण धावून गेले पाहिजे असे प्रतिपादन मान. सौ.सोनाली करेवार यांनी केले.

महिला माता, भगिनींमध्ये सहृदय मैत्रिपूर्ण नाते चिरतर कायम राहावे, समाजहितासाठी सद्विचाराची आदान-प्रदान व्हावी, या हेतुने "मकर संक्रांती" सणाचे औचित्य साधून "हळदीकुंकू व स्नेहमिलन समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनोरंजनाचे विविध खेळ व कला कौशल्याचे सादरीकरणही या प्रसंगी करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागतगीत सौ.सुषमा उगे व सौ.रुपाली चहानकर यांनी म्हटले. प्रास्ताविक अध्यक्षा सौ.ज्योती दरेकर यांनी केले. मान्यवरांचा परिचय सौ. कॉलर मॅडम यांनी करून दिला.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव सौ.सुनंदा कन्नमवार यांनी केले तर आभार कोषाध्यक्षा सौ.ज्योती पोराटे यांनी मानले.
     
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वसौ. ज्योती दरेकर,कल्पना ढोले,सुनंदा कन्नमवार, शितल भुजाडे,ज्योती पोराटे, सुवर्णा ढवळे,रुपाली चहानकर, सुषमा उगे, सविता यारेवार, छाया गोडें, निता ढाले,सुशिला इखारे,ज्योती आस्कर,राधा गिलबिले, किर्ती उरकुडे, कोमल भागवत, नेहा सोरटे, पंकजा रोकडे, ज्योत्स्ना लांडे,गीता ऊगे नेहा घोडे, प्रतिभा जतकर तसेच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला मंचच्या पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेतली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)