Top News

खेळाडूत जोश व जिद्द आवश्यक:- गुरुदास कामडी #chandrapur


चंद्रपूर;- खेळ खेळत असताना सांघिक भावना महत्त्वाची आहे. सांघिक भावनेतून कोणत्याही खेळात यश प्राप्त होते. सांघिक भावनेतून एकतेचे प्रदर्शन होते. यातून एकात्मता निर्माण होऊन विजयाचे लक्ष गाठता येते. कोणत्याही क्रिडास्पर्धेत हार - जित महत्वाची नाही. खेळाडूंनी खेळाडू वृत्तीने मैदानावर उतरले पाहिजे. खेळाडूत जिद्द व जोश महत्त्वाचा आहे. अशी भावना गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांनी व्यक्त केली.

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली च्या वतीने अमृत क्रिडा व कला महोत्सवाचे आयोजना अंर्तगत गोंडवाना विद्यापीठ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध क्रिडास्पर्धेचे आयोजित करण्यात आलेल्या आहेत. विद्यापीठाच्या नवरगांव झोन अंर्तगत दिनांक १४ जानेवारी २०२३ रोजी क्रिकेट स्पर्धांचे आयोजन नवरगांव येथील श्री ज्ञानेश महाविद्यालय येथील क्रिडांगणावर आयोजित करण्यात आलेल्या होत्या.

अमृत महोत्सव क्रिडा स्पर्धेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीचे अधिसभा सदस्य गुरुदास कामडी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण संस्था नवरगांव चे सचिव प्राचार्य सदानंद बोरकर, प्रमुख अतिथी म्हणून श्री ज्ञानेश महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुरेश बाकरे, सिनेट सदस्य विजय घरत, भाजपा जिल्हा महामंत्री संजय गजपूरे, रमेश बोरकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत क्रिडा स्पर्धेचे उदघाटन कार्यक्रम संपन्न झाला.

कार्यक्रमाची सुरुवात संत ज्ञानेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.याच कार्यक्रमात गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या अधिसभेवर निवडूण आल्याबद्दल अधिसभा सदस्य गुरुदास कामडी, विजय घरत यांचा संस्थेचे सचिव प्राचार्य सदानंद बोरकर यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना रोजच्या ताणतणावातून मुक्त ता मिळावी. तसेच त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करण्यासाठी अशा क्रिडास्पर्धा आयोजनाची आवश्यकता आहे. शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या बरोबर च महाविद्यालयीन शिक्षक क्रिडास्पर्धांची आवश्यकता आहे असे प्रतिपादन सिनेट सदस्य विजय घरत यांनी व्यक्त केले.

     नवरगांव झोन अंर्तगत घेण्यात आलेल्या क्रिडास्पर्धेत वडसा, ब्रम्हपुरी, चिमूर, नागभीड, सिंदेवाही तालुक्यातील विविध महाविद्यालयातील शिक्षकेत्तर कर्मचारी चमू सहभागी झाल्या आहेत.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. मनोज अरमरकर तर सचांलन डॉ. ललित उजेडे यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने