Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

मार्कंडा यात्रेवरून परत येताना म्हैस आदळल्याने ऑटो पलटला #chandrapur #accident #pombhurna


पोंभूर्णा:- मार्खंडा येथील महाशिवरात्री यात्रेवरून परत येताना पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ म्हैस आदळल्याने ऑटो पलटून चार लोक गंभीर जखमी झाले असून यात दोन चिमुकल्याचा समावेश आहे सदर घटना रविवारी संध्याकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.

विदर्भाची काशी असलेल्या मार्खंडा येथे महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते.येथे दर्शनासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. बल्लारपूर येथून काही भाविक मार्खंड्याला यात्रेसाठी गेले होते.दर्शन करून परत येत असताना पोंभूर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द गावाजवळ ऑटोला म्हैस आदळल्याने ऑटो (एमएच-३४-बिएच-१२०३) पलटून चार जखमी झाले.यात मामाकडे आलेली दिपाली गजानन येसने रा. पळसमंडळ जि. अमरावती हिला गंभीर मार लागला असून तीचा हात व पाय फॅक्चर झाला आहे.

जखमी मध्ये मृण्मयी रवि सुरजोगे वय ९ वर्ष रा.बल्लारपूर,तक्ष रवि सुरजोगे वय ११ वर्ष रा.बल्लारपूर व रवि सुरजोगे वय ३९ वर्ष रा.बल्लारपूर जखमी असून चौघांनाही ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.मात्र प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूरला रेफर करण्यात आले.घटनेचा पुढील तपास पोंभूर्णा पोलीस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत