डॉक्टरशी गैरवतणूक; दोघांवर गुन्हा दाखल #chandrapur #ballarpur #doctor

Bhairav Diwase
1 minute read


बल्लारपूर:- बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयाच्या डॉक्टरशी गैरवर्तणूक केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. डॉक्टरांच्या तक्रारीवरून दोन युवकांवर बल्लारपूर पोलिसांनी भादंवि ३५३ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

भगतसिंग वॉर्डातील कुणाल वर्मा (२२) हा कैथवास नावाच्या आपल्या मित्रासोबत दुचाकीवर बसून जाताना नगर परिषद चौकात समोरून गाडी आल्याने त्याची दुचाकी घसरली. मागे बसलेला मित्र खाली पडल्याने त्याला मलमपट्टी करण्यासाठी ग्रामीण रुग्णालयात गेला. तेथे असलेल्या डॉ. भास्करवार यांच्याशी हुज्जत करू लागला. वाद विकोपाला गेल्याने डॉक्टरने दोघांची तक्रार पोलीस ठाण्यात केली. त्यांच्या तक्रारीवरून बल्लारपूर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाबाबत अन्य माहिती जाणून घेण्यासाठी पोलिसांकडून सखोल चौकशी केली जात आहे.