प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर अत्याचार #chandrapur #ballarpur

Bhairav Diwase


बल्लारपूर:- अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून सात महिन्यांपासून अत्याचार करणाऱ्या युवकास बल्लारपूर पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून रविवारी अटक केली. निखिल प्रकाश येलकुर्तवार ( वय १९ वर्षे) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

निखिलने अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यावर सात महिने अत्याचार केला. आरोग्याची समस्या निर्माण झाल्याने तिच्या आईने दवाखान्यात दाखल केले. यावेळी तिला डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर ती गर्भवती असल्याचे सांगितले. तिने आईला निखिलपासून गर्भवती असल्याचे सांगितले. दरम्यान, पीडित मुलीने बल्लारपूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलिसांनी पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून निखिल येलकुर्तवार याला अटक केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.