2 इंची तुळशीच्या पानांवर रेखाटले गजानन महाराजांचे चित्र #chandrapur #Rajura

Bhairav Diwase
0

नेफडो च्या कला, सांस्कृतिक विभागाच्या वतीने अनोखे चित्र रेखाटन.


राजुरा:- संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्ताने नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेअंतर्गत राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या महिला जिल्हा उपाध्यक्ष राजश्री उपग्नलावार यांनी दोन इंच तुळशीच्या पानावर गजानन महाराजांची प्रतिमा रेखाटली आहे.


नेफडोच्या राष्ट्रीय कला, साहित्य व सांस्कृतिक विभागाच्या मार्फत राजश्री उपग्नलावार या नेहमीच आपल्या कलेच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण चित्ररेखाटन, रांगोळी, पेंटिंग, स्टोन आर्ट, धान्यापासून चित्र निर्मिती आणी बोन्साय ट्री निर्मिती असे नवनवीन प्रात्याक्षिक त्या सातत्याने करीत असतात. विशेष म्हणजे कोणते ना कोणते दिनविशेष हे आपल्या कलाकृतीच्या माध्यमातून साजरे करण्याचा व शुभेच्छा देण्याचा त्या नेहमीच प्रयत्न करीत असतात.

या कलाकृतीला नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुयोग धस, राष्ट्रीय उपाध्यक्ष दीपक भवर, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले, उपाध्यक्ष प्रकाश कदम, महिला राज्य अध्यक्षा डॉ. प्रीती तोटावार, उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे, नागपूर विभागा अध्यक्षा कला सांस्कृतिक अल्का दिलीप सदावर्ते, नेफडो नागपूर विभाग अध्यक्ष विजयकुमार जांभुळकर, महिला नागपूर अध्यक्षा रत्ना चौधरी, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष रजनी शर्मा, संतोष देरकर आदींनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)