राज्यस्तरीय लोक कवी वामनदादा कर्डक पुरस्काराने अनुराग गोवर्धन सन्मानितचंद्रपूर:- लोक कवी वामनदादा कर्डक पुरस्काराने सरदार पटेल, महाविद्यालयातील बी. ए. तृतीय मध्ये शिकत असलेला विद्यार्थी अनुराग गोवर्धन याला रविवार दिनांक १२ फेब्रुवारी ला कला फाउंडेशन च्या वतीने राज्यस्तरीय लोक कवी वामनदादा कर्डक प्रथम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कला फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष
प्रशांत दामले यांनी डिसेंबर २०२२ मध्ये साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या लेखक, कवी यांच्या प्रकाशित साहित्य कृती पुरस्कारासाठी मागितल्या होत्या. व जानेवारी २०२३ मध्ये पुरस्कारा करीता निवड प्रक्रिया चालू केली. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील जुनासूर्ला या छोट्याशा खेडे गावात वास्तव्यास असलेल्या अनुराग रवींद्र गोवर्धन यांची लोक कवी वामनदादा कर्डक प्रथम पुरस्काराकरीता निवड केली होती. व त्यास पत्राद्वारे कळविले होते.कला फाउंडेशन च्या वतीने दरवर्षी कुटुंबाचा, समाजाचा व राष्ट्राचा एक जबाबदार घटक या नात्याने करीत असलेले सामाजिक, साहित्यिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, अभिनय, पत्रकारिता, कृषी, आरोग्य, पर्यावरण या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना कला फाउंडेशन च्या वतीने विविध स्वरुपी पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात येते. या वर्षी देखील कला फाउंडेशन. च्या वतीने विविध स्वरुपी पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यात अनुराग गोवर्धन यांना साहित्यिक क्षेत्राचा प्रथम पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात आला.

यावेळेस कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध लेखिका वानिताताई गावंडे उपस्थित होत्या त्याच बरोबर प्रमुख पाहुणे म्हणून ज्ञानेश्वर सांगळे, प्रशांत देशमुख, डॉ. मधुकर जाधवर, गणेश चौधरी, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत दामले व मोठ्या संख्येने साहित्यिकांची प्रामुख्याने उपस्थित होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत