बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने टॉयलेटचा दरवाजाही सोबत नेला #chandrapur

Bhairav Diwase

(बदली होताच पोलीस निरीक्षकाने आपल्या कार्यालयातील टॉयलेटचे दार, खुर्ची-टेबल, एसी, पडदे आणि दिवे काढून नेले)


चद्रपूरः- सरकारी कर्मचाऱ्यांच्या कार्यकाळात बदली ही नेहमीची बाब आहे. बदलीच स्थळ सोडताना अनेक शासकीय कर्मचारी सहकाऱ्यांना, गावकऱ्यांना काहींना काही भेटवस्तू देऊन जातात. पण, एक शासकीय अधिकारी वस्तू घेऊन गेल्याची घटना चंद्रपूर येथे घडली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेतील एका अधिकाऱ्याने नोकरीचे ठिकाण सोडताना इतर वस्तूंसोबत टॉयलेटच्या दरवाजाही सोबत काढून नेला आहे. या अधिकाऱ्याची खमंग चर्चा चंद्रपूर जिल्ह्यात सुरू आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या बळावर अनेक गुन्हेगारांना घाम फोडला होता.

चंद्रपूर येथील स्थानिक गुन्हे शाखेतील बाळासाहेब खाडे नाव असं होतं की जे नाव ऐकताच गुन्हेगारांना धडकी भरायची. अतिशय गुंतागुंतीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा या अधिकाऱ्याने केला होता. चंद्रपुरात अडीच वर्षं स्थानिक गुन्हे शाखेत काढली. आता त्यांची बदली मानव संसाधन विभाग येथे झाली आहे.

अडीच वर्षात या अधिकाऱ्याने स्वतःचा सोयीसाठी काही वस्तू खरेदी केल्या होत्या. बदली झाल्यानंतर या अधिकाऱ्याने वस्तू सोबत नेल्याच, त्यासोबतच टॉयलेटला लावला दरवाजाही नेला. बहुतांश अधिकारी ज्या गावात कर्तव्य बजावतात, त्या गावाला काहीतरी भेटवस्तू देऊन जातात. त्या गावाशी त्यांचे भावनिक ऋणानुबंध जोडले जातात. ज्यांनी आपल्यासाठी सहकार्य केलं, ज्या मातीत आपण काही वर्ष घालवलं त्या मातीला आपली ओळख असावी यासाठी काहीतरी मागे सोडून जातात. मात्र या अधिकाऱ्यान केलेली कामगिरी बघता सर्वांनाच आश्चर्य वाटत आहे.