मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत कोरपना तालुक्यातील रस्ते मंजूर करा #chandrapur


पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांची मागणी


कोरपना:- कोरपना तालुक्यातील विविध गावातील रस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या विकास व संशोधन कार्यक्रमाअंतर्गत मंजूर करण्याबाबत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी केली आहे.


कोरपना तालुक्यातील अनेक रस्त्याचे डांबरीकरण प्रलंबित आहे,त्यामुळे सदर गावातील नागरिकांना रस्त्यावरून ये- जा करताना त्रास सहन करावा लागत आहे,तसेच शेतकऱ्यांनासुधा शेतात दळणवळण करताना त्रास सहन करावा लागत आहे.

सदर प्रकरणाची दखल घेत भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी यांनी कोरपना तालुक्यातील नारंडा ते शेरज बू ७ किमी,नारंडा ते पिपरी ४ किमी, धोपटाळा ते शेरज बु ५ किमी, रामा ३७४ ते पारधीगुडा २.५ किमी रस्त्याचे डांबरीकरण व पुलाचे बांधकाम करण्याबाबत पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना निवेदन सादर केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत