Click Here...👇👇👇

सरदार पटेल महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिर संपन्न #chandrapur #Visapur #Ballarpur

Bhairav Diwase

शिबिरातून निरोप घेताना स्वयंसेवकांना अश्रू अनावर


चंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे शिबिर आयोजित केले होते. दि. ०१ फेब्रुवारीला या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा समारोपीय समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. प्रमोद काटकर सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर, प्रमुख विशेष अतिथी प्राचार्य डॉ. सुभाष मेकाला प्राचार्य जनता महाविद्यालय चंद्रपूर, प्रमुख अतिथी अनकेश्वर मेश्राम उपसरपंच ग्रामपंचायत विसापूर, प्रमुख पाहुणे सौ. शालिनी जयस्वाल राष्ट्रीय शारिरीक शिक्षण महाविद्यालय विसापूर, डॉ. एजाज शेख प्रभारी प्राचार्य शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर, डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार उपप्राचार्य डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, डॉ. सरोजकुमार दत्ता शारिरीक शिक्षण व क्रीडा विभाग प्रमुख शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर, रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व अहवाल वाचन करताना डॉ. वंदना खनके म्हणाले की, या शिबिरात रस्ता सुरक्षा व वाहतूकीचे नियम, सायबर सुरक्षा, आरोग्य तपासणी शिबिर, जल संवर्धन, रोजगार, स्वयंरोजगार व करिअर मार्गदर्शन, शासकीय योजनेची माहिती या विषयावर वक्त्यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच गावात मतदान व स्वच्छतेवर जनजागृती करण्यात आली. तसेच "विद्यापीठ आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत गावातील युवक शिक्षणापासून वंचित असेल त्या युवकांना पुढील शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले. स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख वक्ते म्हणून ‌किरण मोरे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रपूर, मुजावर अली सायबर हाईजिन, प्रॅक्टीशनर, सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर, डॉ. अविशा मडावी वैद्यकीय अधिकारी प्राथ. आरोग्य केंद्र विसापूर, संजय वैद्य जिल्हा समन्वयक जलबिरादरी चंद्रपूर, शैलेश भगत कौशल्य विकास अधिकारी चंद्रपूर, राहुल ताकधट जिल्हा समन्वय अनुलोम संस्था चंद्रपूर वक्ते म्हणून उपस्थित होते.




यावेळी स्वयंसेवकांना उपसरपंच अनकेश्वर मेश्राम, डॉ. स्वप्निल माधमशेट्टीवार, सौ. शालीनी जयस्वाल, डॉ. सुभाष मेकाला यांनी आपल्या भाषणातून स्वयंसेवकांना मोलाचे मार्गदर्शन केले तर साहील गायकवाड, प्रांजली बोढाले या स्वयंसेवकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय भाषणात डॉ. प्रमोद काटकर म्हणाले की, अलीकडच्या काळात समाजात वेगवेगळ्या विचित्र घटना घडताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत आजचा तरुण कुठे तरी भरकटत जाऊ नये म्हणून राष्ट्रीय सेवा योजना या उपक्रमातून समाजपरिवर्तन करण्याचे कार्य आज राष्ट्रीय सेवा योजनेचा तरुण करीत आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे ध्येय, उद्दिष्टे, ब्रीदवाक्य व बोधचिन्ह हे या उपक्रमाचे स्वरूप आणि कार्य स्पष्ट करतात. स्वयंशिस्त, समाजसेवा, लोकशाही, मूल्यशिक्षण हे सर्व स्वयंसेवकांमध्ये रुजविण्यात राष्ट्रीय सेवा योजना यशस्वी झाली आहे. समाजात सामाजिक जाण देणारा, जनजागृती करणारा, तसेच राष्ट्र व समाजाप्रती जबाबदारीचे कार्य करणारा राष्ट्रीय सेवा योजना हा भारत सरकारचा अभिनव उपक्रम आहे.


उठे समाज के लिए उठे उठे
जगे स्वराष्ट्र के लिए जगे जगे
स्वयं सजे वसुंधरा संवार दे
स्वयं सजे वसुंधरा संवार दे..

याच गाण्यांनी सकाळची झोप उघडायची.. 

या शिबिराचे संचालन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी पुरुषोत्तम माहोरे, प्रास्ताविक व अहवाल वाचन रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. वंदना खनके तर आभार रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड यांनी केले.

शिबिराच्या यशस्वीतेसाठी रा. से. यो विभागीय समन्वयक डॉ. उषा खंडाळे, रा. से. यो. कार्यक्रम अधिकारी डॉ. कुलदीप आर गोंड, डॉ. वंदना खनके, पुरुषोत्तम माहोरे, डॉ. निखील देशमुख, दशरथ कामतवार, अनिल पारशीवे , शशीकला पारधी, हनूमंतू डंबारे, इजाज शेख, सुरज बोरघरे, रुचिता टोकलवार, राणी गोंड, दर्शन मेश्राम, सिध्दांत निमसरकार, भैरव दिवसे, साहिल चौधरी, शालिनी निरमलकर, उर्वशी बोडपल्लीवार यांनी परिश्रम घेतले.


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे ७ दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. दि. 31 जानेवारीला सकाळच्या सुमारास विसापूर गावात मतदान व स्वच्छतेवर जनजागृती करण्यात आली. तसेच "विद्यापीठ आपल्या दारी" या उपक्रमांतर्गत गावातील युवक शिक्षणापासून वंचित असेल त्या युवकांना पुढील शिक्षणासाठी संधी उपलब्ध करून देण्यासाठी सर्वेक्षण करण्यात आले.


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित सर्वोदय शिक्षण मंडळ, चंद्रपूर द्वारा संचालित सरदार पटेल महाविद्यालय, चंद्रपूर राष्ट्रीय सेवा योजना पथकाद्वारे ७ दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते. दि. २९, ३० जानेवारी आणि १ फेब्रुवारीला योगनृत्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गोपालजी मुंदडा, आकाश घोडमारे, सुरेश घोडके, सुरज घोडमारे, संतोष पिंपळकर, हरिदासजी नागपुरे, श्रवणजी मुंदडा, मोरूभाऊ उपलांचीवार उपस्थित होते.



स्वयंसेवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी सांस्कृतिक व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.