बिबट्याच्या दोन दातासह आरोपी ताब्यात #chandrapur


चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई


चंद्रपूर:- दि.10/02/2023 रोजी स्थानिक गुन्हे शाखचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांना गोपनिय माहिती मिळाली की, बेनार चौक मल्लेलवार देशी दारूचे दुकानाचे बाजुला एक इसम बिबट्याचे दात स्वतः जवळ बाळगुन ते विकण्याकरीता फिरत आहे अशा खबरे वरून वनपरिक्षेत्र अधिकारी, संरक्षण व अतिक्रमण निर्मुलन चंद्रपूर वन विभाग, चंद्रपूर श्री. आर.डी. घोरूडे व त्यांचे पथकांना पाचारण करून मिळालेल्या माहितीच्या अनुशंगाने स.पो.नि. बोबडे व स.पो.नि. भोयर यांचे अधिपत्या खाली दोन पथक तयार केले.

मिळालेल्या खबरे प्रमाणे बेनार चौक मल्लेलवार देशी दारूचे दुकाना जवळ गेले असता तेथे खबरे प्रमाणे इसम नामे प्रविण नरसय्या बोडू वय 34 वर्षे रा. लालपेठ कॉलरी नं.03 रेल्वे लाईन जवळ, चंद्रपूर हा मिळून आला त्याची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याचे फुलपॅन्टचे खिशात एका प्लॅस्टीक पिशवी मध्ये वन्य प्राण्याचे दोन दात मिळून आले. ते सोबतचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. घोरूडे सा. यांनी पाहीले असता ते दात हे वन्यप्राणी बिबट त्याचे असल्याचे प्रथमदर्शनी सांगीतले. सदर दोन्ही दात पंचासमक्ष पुराव्या कामी जप्त करून ताब्यात घेतले असून नमुद इसमा विरूद्ध वनकायदया अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री. रविंद्रसिंह संतोषसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधु यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांचे नेतृत्वात स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, स.पो.नि.मंगेश भोयर, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. घोरूडे, पो.हवा. धनराज करकाडे, प्रमोद डंबारे, ना.पो.कॉ. संतोष येलपुलवार, दिनेश अराडे, पो.कॉ. नरेश डाहुले, गोपाल आतकुलवार, रविंद्र पंधरे, प्रांजल झिलपे, कुंदन बावरी, नितीन रायपुरे व वनविभागाचे पथक यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास वनविभाग, चंद्रपूर हे करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत