Top News

शरदराव पवार महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एक दिवसीय लाक्षणिक संप #chandrapur


(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) मुबारक शेख, कोरपना
कोरपना:- महाराष्ट्रातील सर्व अकृषी विद्यापीठीय तसेच सर्व सलग्निक महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी संघटनांनी आपल्या विविध मागण्या आश्वासित प्रगती योजना, जुनी पेन्शन, सातवा वेतन आयोगाचा आजपर्यंतचा फरक, याबाबतच्या शासन विरोधी धोरणाच्या विरोधात कृती समितीच्या आदेशानुसार गडचांदुर येथील शरदराव पवार महाविद्यालयातील सर्व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयासमोर आज सकाळी ०८ वाजेपासून काळया फिती लावून एक दिवसीय लाक्षणिक संपात महाविद्यालयीन कामकाज बंद करून सहभागी झाले आहे.

या सर्व मागण्याकरिता पुकारलेल्या आंदोलनाच्या चौथ्या टप्प्यात गुरुवारी शरदराव पवार कला व वाणिज्य म्हाविद्यालय गडचंदुर ता. कोरपना जि.चंद्रपूर येथील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एक दिवसाचा लाक्षणिक संप सुरू केला, त्यामुळे महाविद्यालयातील सर्व कामकाज ठप्प झाले होते.

शासनाच्या कोणत्याही आश्वासनाला बळी न पडता जोपर्यंत सदर मागणीचे जीआर लेखी स्वरूपात निघणार नाही तोपर्यंत संप सुरूच राहील. आणि मागण्या मान्य न झाल्यास दि.२०फरवरी २०२३पासून बेमुदत संप पुकारल्या जाणार असल्याचा शिक्षकेतर कर्मचारी यांनी निर्धार केला आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंग, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य डॉ. संजय गोरे तसेच महाविद्यालयाचे ज्येष्ठ प्रा. डॉ. हेमचंद दूधगवळी , प्रा. डॉ. सुनील बिडवाईक, प्रा.डॉ.सतेंदर सिंग प्रा. मंगेश करंबे तसेच सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूरचे प्राचार्य प्रा.धर्मराज काळे यांनी सुद्धा एक दिवसीय लाक्षणिक संपाच्या मंडपाला भेट दिली आणि त्यांच्यासमोर शिक्षकेतर कर्मचारी, शशांक नामेवार विनोद उरकुडे,रमेश भोयर ,तानाजी बुराण, सुभाष टेकाम, धर्मराज पोहाणे, सुरेश चांदेकर इत्यादीनी आपल्यावर शासनाकडून हेतूपुरस्कत जाणूनबुजून होत असलेल्या अन्यायाबाबतची व्यथा मांडली.

विद्यापीठ क्षेत्रातील विविध महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचारी या लाक्षणिक संपात सहभागी होते. त्यामुळे विद्यापीठ प्रक्षेत्रातील महाविद्यालये ओस पडल्याचे निदर्शनास आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने