गांजाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक #chandrapur #gadchiroli #arrested


दोन लाखांचा मुद्देमाल जप्त


गडचिरोली:- गांजा या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या दोन जणांना धानोरा येथून पोलिसांनी अटक केली. जय निशिब बाला (वय २२) व मनिशंकर सरकार (३२) अशी आरोपींची नावे असून, दोघेही कर्नाटक राज्यातील रायचूर जिल्ह्यातील आर. एस.ज्ञनंबर २ येथील रहिवासी आहेत.

दोन संशयित इसम पिशव्यांमध्ये गांजा घेऊन धानोरा येथील नवीन बसस्थानकाकडे जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून दोघांची तपासणी केली असता त्यांच्याकडे १९ किलो १५ ग्रॅम गांजा आणि अन्य साहित्य आढळून आले. बाजारात या साहित्याची किंमत २ लाख १४ हजार ८५० रुपये एवढी आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधीक्षक श्री.नीलोत्पल, अपर पोलिस अधीक्षक(अभियान) अनुज तारे, अपर पोलिस अधीक्षक(प्रशासन) कुमार चिंता, अपर पोलिस अधीक्षक(अहेरी) यतीश देशमुख, उपविभागीय पोलिस अधिकारी स्वप्नील जाधव यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुधाकर येडे, उपनिरीक्षक सचिन सानप, हवालदार पुरुषोत्तम टेंभुणे, गितेश्वर बोरकुटे, लक्ष्मीकांत काटेंगे, रुपेश दर्रो, अमोल कोराम, कपिल जिवने, प्रवीण गोडे, मारोती वाटगुरे, तुकाराम कोरे, प्रीती गोडबोले यांनी ही कारवाई केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत