Top News

राज्यव्यापी बेमुदत संपात सर्व विभागातील कर्मचाऱ्यांची वज्रमुठ #chandrapur #gondpipari


तालुक्यात १०० टक्के कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग


गोंडपिपरी:- जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी या मुख्य मागणीसह इतरही सतरा मागणीसाठी राज्यव्यापी संप पुकारण्यात आला.त्यात कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत नियमित करावे,रिक्त पदे भरण्यात यावी,नवीन शैक्षणिक धोरण रद्द करण्यात यावे,निवृत्तीचे वय ६० वर्ष करावे इत्यादी अनेक मागण्यासाठी अभूतपूर्व संप करण्यात यशस्वी झाले.राज्य सरकारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वाखाली बेमुदत संप आयोजित करण्यात आला असून यात गोंडपिपरी तालुक्यातील १०० टक्के कर्मचाऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग होऊन संप यशस्वी करण्यास हातभार लावला.

या संपात आरोग्य, महसूल, बांधकाम, कोषागार, महसूल, वनविभाग, महिला बालकल्याण विभाग, पशुसंवर्धन विभाग, शिक्षण विभाग व इतर विभागातील कर्मचाऱ्यांनी संपात सहभागी झाले असून तालुक्यातील संपूर्ण शाळा, महाविद्यालय, कार्यालये ठप्प दिसून आली म्हणून शासनाने या मुख्य मागणीचा विचार न केल्यास जुनी पेंशन मिळेपर्यंत कर्मचारी संप मागे घेणार नाही. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी राज्यव्यापी संप टाळून बैठकीला बोलाविले होते पण मागील चार वर्षांपासून जुनी पेंशनवर समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले पण राज्य मध्यवर्ती संघटनेचे विश्वास काटकर यांनी लेखी आश्वासन देण्याचे संबोधित केले अन्यथा संप अविरत राहण्याचे आवाहन सर्व कर्मचाऱ्यांना दिले त्यामुळे गोंडपिपरी तालुक्यातील सर्व कर्मचारी समन्वय संघटनांचे कर्मचारी उपस्थित राहून मनोगत व्यक्त करण्यात आले.

राज्यव्यापी संघटनेत जुनी पेंशन का महत्वाची आहे आणि त्याची संपूर्ण पार्श्वभूमी दुशांत निमकर यांनी स्पष्ट केली तसेच ग्रामसेवक संघटनेकडून जितेंद्र खोब्रागडे,राऊत सर,कृषी विभागातून ऋषीदेव निकोडे,महसूल विभागातून अजय देवतळे,उपकोषागार कार्यालयातून गुरनूले सर,आरोग्य विभागातून युवराज सोयाम,मोतीराम निमगडे,पंचायत विभागातून सावसागडे साहेब,शिक्षण विभागातून पत्रुजी डोके,चकिनाला सर,प्रेम खोब्रागडे,दिनेश निमकर,आकाश झाडे,विक्रम ताळे,सिध्दार्थ रंगारी,रामेश्वर पातसे,रत्नाकर चौधरी,प्रमोद दुर्गे,मनीषा मडावी,किशोर गेडाम,पी डी उके,सुनील सातपुते,डोमाजी मोरे,वृषाली जोशी,मंगला वासेकर, सुवर्णमाला भगत,सचिन बावणे इत्यादी व्यक्तींनी आपापल्या संघटनेचा सक्रिय सहभाग दर्शवून संपाला यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

राज्यव्यापी बेमुदत संपादरम्यान प्रास्ताविक अरुण गावतुरे यांनी केले.खूप लढलो बेकीने,आता लढू एकीने या उद्देशाने या संपाचे सूत्रसंचालन महेश आलेट्टीवार यांनी केले तर आभार प्रदर्शन तानाजी अल्लीवार यांनी केले यात गोंडपिपरी तालुक्यातील सर्व कर्मचारी यांनी एकत्र येत संप यशस्वी करण्यात मोलाची भूमिका वठविली आणि संप यशस्वी करण्यास राजेश्वर अम्मावार,भानुदास केदार,मनोज साबळे,मिलिंद मडावी,देवानंद रामगिरकर,रमेश कोकरे,विठ्ठल गोंडे,निलेश मडावी,राजेंद्र कोवे,संतोष कुमार उईके,गणेश आसेकर,महेंद्र मुद्दमवार,पुरमशेट्टीवार,पदमा मदनकर,मांढरे सिस्टर,महादेव सिडाम तसेच उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी संप यशस्वी करण्यास मोलाचा हातभार लावला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने