Top News

शहरातील भंगार चोरट्यांचा बंदोबस्त करा #chandrapur


प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे यांची मागणी


चंद्रपूर:- घुग्घुस शहरातील भंगार चोरट्यांचा बंदोबस्त करा अशी मागणी प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे यांनी भुस्खलनग्रस्त महिलांसह घुग्घुसचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

🌄
घुग्घुस शहरातील अमराई वार्डात सध्या भंगार चोरट्यांची टोळी सक्रिय झाली आहे. मागील वर्षी २६ ऑगस्ट रोजी अमराई वार्डात भुस्खलन झाले होते. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून १६० कुटुंबियांना इतरत्र हलविण्यात आले होते.

🌄
अनेक कुटुंब अमराई वार्डातील आपले घर खाली करून इतर ठिकाणी भाड्याने राहत आहे. अनेक कुटुंब आपले घर सोडून गेले आहे. ही संधी हेरून घरी कोणीच नसल्याने घराचे लोखंडी दरवाजे, नळाचे लोखंडी पाईप, टीनाचे शेड, घरावरील टीनाचे पत्रे भंगार चोरटे कापून नेत आहे. काहींनी इतर साहित्य घरी ठेवले आहे. ते चोरी जाण्याची भीती भुस्खलनग्रस्तांना आहे. त्याअनुषंगाने अमराई वार्डातील भुस्खलनग्रस्त महिलांनी ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार, १४ मार्च रोजी घुग्घुस प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे यांची भेट घेतली व आपल्या समस्या सांगितल्या.
🌄

ही समस्या लक्षात घेत प्रयास सखी मंच अध्यक्ष किरण बोढे यांनी भुस्खलनग्रस्त महिलांसह घुग्घुसचे ठाणेदार आसिफ राजा शेख यांची भेट घेतली व याबाबत चर्चा केली व भंगार चोरट्यांच्या टोळीचा तत्काळ बंदोबस्त करावा अशी मागणी निवेदनातून केली. चर्चेदरम्यान ठाणेदार आसिफ राजा शेख यांनी लवकरच भंगार चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन शिष्टमंडळास दिले.

🌄
यावेळी माजी ग्रा. पं. सदस्या सुचिता लुटे, वैशाली ढवस, पुष्पा रामटेके, सुनीता गेडाम, चंदा कार्ले, सरिता सोळंके, पुनम वाघमारे, रेखा मेश्राम, लता कामतवार, शोभा सपाटे, वनिता नवनागे, शोभा मुडपल्लीवार, गीता सुरोशे व सुनंदा लिहीतकर उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने