Top News

निधी कंपनी अनाधिकृत/फर्जी नाही:- संचालक #chandrapur


पत्रकार परिषदेत माहिती


चंद्रपूर:- दिनांक 11 मार्च 2023 रोजी आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, चंद्रपूर जिल्हयातील निधी कंपनीचे बाबतीत या निधी कंपनी अनाधिकृत/फर्जी असल्याबाबत आणि या कंपनीसोबत नागरीकांनी व्यवहार करू नये अशा आशयाची बातमी प्रकाशीत झाली आहे. या कंपनीत संपदा अर्बन निधी लिमी. या कंपनीचाही उल्लेख आहे.
🎂

संपदा अर्बन निधी लिमीटेड ही अनाधिकृत किंवा फर्जी नसून, केंद्र शासनाच्या कंपनी कायद्याअंतर्गत नोंदणी झालेली अधिकृत कंपनी आहे. कंपनीचे कायद्याप्रमाणे, निधी कंपनीसाठी असलेल्या नियमावलीप्रमाणे संपदा अर्बन निधी लिमीटेड काम करीत असून, याबाबत कोणत्याही सभासदाची कोणत्याही प्रकारची तक्रार नाही.

🌄
17 डिसेंबर 2019 मध्ये कोविड काळात या कंपनीची स्थापना करण्यात आली, कंपनीने कोरोणा काळात महिलांना, स्वयंरोजगार करणार्यांना लघु कर्ज देवून त्यांचे उपजीवीकेस हातभार लावलेला आहे. कंपनीचे संचालक हे समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती असल्यांने, समाजातील अनेकांनी या कंपनीत गुंतवणूक केली असून, त्यांचा नियमीत परतावा मुदतीत अथवा त्यांचे मागणीप्रमाणे केला जात आहे.
🌄

निधी कंपनीचे नियमाप्रमाणे कंपनीला मान्यता मिळाल्यानंतर, एनडीएच 4 कंपनी मंत्रालयाकडे दाखल करावे लागते. संपदा अर्बन निधीने एनडीएच 4 दाखल केले. कंपनी कायद्याप्रमाणे 45 दिवसात एनडीएच 4 बाबत मंत्रालयाने निर्णय न दिल्यास 'डिम अप्रुवल' आहे असे गृहीत धरून व्यवसाय केला जातो. कंपनी मंत्रालयाने संपदा अर्बन निधीचे एनडीएच 4 बाबत कोणताही निर्णय न दिल्यांने, डिम अप्रुवल द्वारे संपदा अर्बन निधीने सभासदासोबत काम करणे सुरू केले.
डिसेंबर 2022 अखेर कंपनी मंत्रालयाने, संपदा अर्बन निधी लिमीटेडचे एनडिएच 4 नाकारले, तसा मेल त्यांनी पाठविला. कंपनी अॅक्ट 2013 चे कलम 406 प्रमाणे, 15-08-2019 चे सुधारणेप्रमाणे आणि निधी नियम 2014 व सुधारित नियम (अ ) आणि (ब ) प्रमाणे संपदा अर्बन निधी या नियमामध्ये नमूद केलेल्या सर्व गोष्टीचे अनुपालन काटेकोरपणे करीत आहे.

🎂
एनडीएच 4 नाकारल्यानंतर, पुन्हा नव्याने एनडीएच 4 कंपनी मंत्रालयाकडे सादर केले असून, हा प्रस्ताव कंपनी मंत्रालयाकडे प्रलंबीत आहे. त्यामुळे संपदा अर्बन निधी लिमीटेड अनाधिकृत किंवा फर्जी आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. याबाबत आम्ही आर्थिक गुन्हे शाखेला कळविले आहे.
🎂

संपदा अर्बन निधी लिमीटेडने जिल्हयात कोरोणा काळात सामान्य महिलांना, स्वयंरोजगार करणार्यांना मोठा आधार दिला असून, या कंपनीच्या माध्यमातून जिल्हयातील 30 च्या वर युवक/युवतीना प्रत्यक्ष रोजगार दिला आहे. नव्याने दाखल केलेले एनडीएच 4 ला मंजूरी मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे.

🎂
संपदा निधीकडे एकूण गुंतवणूक....

1.दैनिक बचत ठेवी- 1,41,87,834.00 (एक कोटी एकेचाळीस लाख सत्त्यांषी हजार आठशे चैतीस रूपये)
2.सेविंग बचत ठेवी - 27,80,207.00 (सत्तावीस लाख अंशी हजार दोनशे सात रूपये)
3.आवर्त ठेव - 11,60,480.00 (अकरा लाख साठ हजार चारशे अंशी रूपये)
4.मुदत ठेव - 2,34,95,624.00 (दोन कोटी चैतीस लाख पंचान्नव हजार सहाशे चैवीस रूपये)
एकूण जमा : 4,16,24,145.00 (चार कोटी सोळा लाख चोवीस हजार एकशे पंचेचाळीस रुपये)
कर्ज
1.दैनिक ठेवीवरील कर्ज - 15,94,947.00 (पंधरा लाख चौर्यांन्नव हजार नवशे सत्तेचाळीस रूपये)
2.मुदत ठेवीवर कर्ज - 1,67,345.00 (एक लाख सदुसष्ठ हजार तीनशे पंचेचाळीस रूपये)
3.सभासद कर्ज - 24,86,829.00 (चोवीस लाख छानशी हजार आठशे एकोनतीस रूपये)
4.वाहन कर्ज - 2,84,493.00 (दोन लाख चैरांशी हजार चारशे त्रांन्नव रूपये)
5.कर्मचारी कर्ज - 2,84,072.00 (दोन लाख चैरांशी हजार बहात्तर रूपये)
6.सुर्वण कर्ज - 54,910.00 (चौपन्न हजार नवशे दहा रूपये)
7.गृह कर्ज - 3,91,780.00 (तीन लाख एक्यान्नव हजार सातशे अंशी रूपये)
8. व्यवसायीक कर्ज - 2,17,86,237.00 (दोन कोटी सतरा लाख छांन्नशी हजार दोनशे सदतीस रूपये)
9.सामान्य कर्ज - 2,87,270.00 (दोन लाख सत्त्यांशी हजार दोनशे सत्तर रूपये)
10.आत्मनिर्भर कर्ज - 16,84,182.00 (सोळा लाख चैरांशी हजार एकशे ब्यानशी रूपये)
11.गट कर्ज - 12,42,605.00 (बारा लाख बेचाळीस हजार सहाशे पाच रूपये)
एकूण कर्ज : 3,02,64,670.00 (तीन कोटी दोन लाख चौशष्ठ हजार सहाशे सत्तर रुपये)
गुंतवणूक / जमा


1.राष्ट्रीयकृत बैंकेतील गुंतवणूक - 36,20,000.00 (छत्तीस लाख वीस हजार रूपये)
2.बैंकेतील शिल्लक - 47,00,000.00 (सत्तेचाळीस लाख रूपये)
3. शेयर जमा – 20,00,000.00 (वीस लाख रुपये )
4. हातातील रोकड - 5,00,000.00 (पाच लाख रूपये)
5. स्थावर मालमत्ता- 20,00,000.00 (वीस लाख रूपये)
एकूण गुंतवणूक : 1,10,20,000.00 (एक कोटी दहा लाख वीस हजार रुपये)
एकूण सभासद - 4,014
..
टिप: याशिवाय अधिक माहिती करिता संपदाचे कार्यालयात संपर्क साधल्यास आवश्यक माहिती पुरविण्यात येईल)

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने