Top News

आपण शेतकऱ्यांवीषयी संवेदनशील होणार आहोत का ? ॲड. दिपक चटप थेट लंडन मधून #Landon #chandrapur #article


आज १९ मार्च. याच दिवशी १९८६ ला यवतमाळातील चिलगव्हाण येथील ११ वर्षे सरपंच पद व ४० एकर शेती असलेले शेतकरी साहेबराव करपे पाटील यांनी कुटुंबियांसोबत आत्महत्या केली. ही बहुचर्चित शेतकरी आत्महत्या ठरली. मात्र शेतकरी आत्महत्यांचे सत्र आजही सुरुच आहे. भारतात दररोज सुमारे तीस शेतकरी आत्महत्या करतात. दक्षिण आशियात सर्वाधिक आत्महत्या भारतात होतात. हे मानवी हक्कांचे भयावह उल्लंघन आहे.

जीवनावश्यक वस्तू कायदा, सिलिंग कायदा आणि भूसंपादन कायदा यांसारखे सध्याचे कायदे शेतकऱ्यांना मारक ठरणारे आहेत. याशिवाय, अमेरिकेसारख्या श्रीमंत राष्ट्रांची कृषी धोरणे भारतीय शेतकर्‍यांवर कसा प्रभाव पाडतात आणि या महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघात समिती, परिषदा आणि करारनाम्यांचा असलेला अभाव याची मांडणी केली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी आत्महत्येविषयी सहवेदना व्यक्त करण्यासाठी आज 'अन्नत्याग आंदोलन' करण्यात येते.

मी आज लंडन येथिल महात्मा गांधी यांच्या पूतळ्यासमोर उपवास करणार आहे. या उपवासातून भूकेचा शोध घेत आपल्या शेतकऱ्यांविषयी मरत चाललेल्या संवेदना जागृत होईल. 'ॲग्रोवन' या कृषी दैनिकात 'शेतकऱ्यांसाठी एकदिवसीय अन्नत्याग आंदोलन कशासाठी?' हा आढावात्मक लेख... नक्की वाचा.

-ॲड.दीपक चटप

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने