Top News

प्रत्येक क्षेत्रात महिला उमटवीत आहेत कर्तुत्वाचा ठसा:- सौ. सपना मुनगंटीवार #chandrapur


चंद्रपूर:- प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रीयांनी उज्ज्वल कामगिरी गाजविली आहे. एक प्रेमळ मुलगी, आई, बहीणीपासून सुरू झालेला तिचा प्रवास सर्वोच्च अशा राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचला आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला आपल्या कर्तुत्वाचा यशस्वी ठसा उमटवीत आहे. मिळालेल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये संधीचे सोने महिला करत आहे. नवजीवन महिला योग समिती तुकूम, चंद्रपूर तर्फे आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात असे प्रतिपादन सौ. सपना सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय चंदावार, प्रमुख अतिथी श्रीमती गंगुबाई जोरगेवार, डाॅ. कल्पनाताई गुलवाडे, डाॅ. शर्मीलाताई पोद्दार, डाॅ. मुंधडा, शरद व्यास, रमेश ददगाड, सुभाष कासनगोट्टूवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, संजीवनी कुबेर, संगीता चव्हाण, वैजंती गहूकर, अक्षता देवाळे, वनश्री मेश्राम, अरूणा शिरभैये, निलिमा चरडे, निलिमा गोरगीरवार, शोभा कुळे तसेच योग नंदीनी ग्रृपचे सदस्य व आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.

सपना मुनगंटीवार पुढे म्हणाल्या, स्त्रीयांनी आपली संस्कृती जपत आपल्या यशस्वी कामगिरीची मोहर उमटविलेली आहे. ग्रामीण भागापासून ते जागतिक स्तरावर महिला सर्व क्षेत्रात सक्षम झाल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

यावेळी समाजातील कर्तृत्ववान महिलांचा सत्कार करण्यात आला. स्वागत गीत अरूणा शिरभैये व निलिमा गोरगिरवार यांनी प्रस्तूत केले. वैजंती गहूकर व निलिमा चरडे यांनी समूह नृत्य सादर केले. आस्था शेट्टी यांनी भरतनाट्यम नृत्य सादर केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नवजीवन महिला योग समिती अध्यक्षा सौ. सपना नामपल्लीवार यांनी केले. तर संचालन वनश्री मेश्राम व आभार प्रदर्शन शुभांगी डोंगरवार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता नवजीवन महिला योग समितीच्या सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. तुकूम येथील अनेक लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने