गडचिरोली जिल्ह्यात नक्षल बॅनर आढळल्याने खळबळ #chandrapur #gadchiroli

Bhairav Diwase

एटापल्ली:- एटापल्ली तालुक्याती कसनसुर मार्गावरील मवेली गावाजवळील पुलाजवळ आज सकाळच्या सुमारास नक्षल बॅनर आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

एटापल्ली कसनसूर मार्गावरील मवेली नजीक असलेल्या पुलाजवळ नक्षल्यांनी लाल रंगाचे नक्षल बॅनर लावल्याले परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी माओवादी यांनी लावलेल्या बॅनरमध्ये कसनसुर ते पीव्ही 86 रोडचे काम बंद करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यासोबत रोडचे काम करणार्‍या कंट्राटदारालाही या बॅनरमधून रोडचे बांधकाम केल्यास त्याचा परिणाम भोगण्याची तयारी ठेवा, असा इशाराही त्यांनी बॅनरमधून दिला आहे. यावरून पुन्हा दक्षिण गडचिरोली भागात हळूहळू नक्षल कारवाया वाढताना दिसत आहेत.