गारपिटीसहीत मुसळधार पाऊस #chandrapur


शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी


कोरपना:- गेल्या तीन चार दिवसापासून वातावरणात बदल झाला असून आकांत, वारा, विजेच्या कडकडाटासहित पावसाला दोन दिवसापासूनच सुरुवात झाली अक्षरंशा गडचांदूर शहराला पावसाने चांगलेच झोडपून काढले.

आज पावसासोबत गारपिट मोठ्याप्रमाणात आजूबाजूच्या शेतात सुद्धा झाली यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले हवामान खात्याने 17 ते 21 पर्यंत येलो अलर्ट दिला असून 19, 20, 21. ला ऑरेंज अलर्ट दिला त्यातच कोरपना तालुक्यात अवकाळी पवसासहीत मोठ्या प्रमाणात गारपीठ सुध्धा झाली. समोर पुन्हा दोन दिवस ऑरेंज अलर्ट असल्याने अवकाळी पावसाची श्यकता वर्तवली जात असून विजेच्या कदक्या सहित वारा आकांत याची सुद्धा श्यक्यता वर्तवली आहे.

शेतात उभे असलेले हरभरा,गहू या पिकाचे तसेच कापणी पश्चात असलेले पिकांचे नुकसान झाले आहे, कृषी विभाग व विमा कंपन्यांनी त्वरित सर्वेक्षण करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी.
उद्धव पुरी, शेतकरी तथा सामाजिक कार्यकर्ता गडचांदूर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या