NOC मागचा मास्टर माईंड कोण असेल?
कोरपना:- पुन्हा एक नवीन स्थलांतरित दारू दुकानाचे लवकरच आगमन होणार असल्याचे खमंग चर्चा शहरात पसरली 15मार्च च्या सर्वसाधारण सभेत विषय मांडला असून. आता मात्र या विषयाने वेगळेच वळण घेतले आहे यामुळे मद्यप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण पसरले असून दारू दुकानासाठी 'शिंदे' तर्फे ना-हरकतची मागणी नगरपरिषदकडे करण्यात आली होती.
अगोदरच गडचांदूर शहरात दारूची दुकाने भरपूर आहे. यालाही जर नगरपरिषद सत्ताधाऱ्यांनी ना-हरकत दिले तर भविष्यात गडचांदूरात दुधापेक्षा दारूची दुकानेच जास्त दिसतील. एकामागे एक येणाऱ्या दारूच्या दुकानांमुळे शहरातील शांततेला गालबोट लागण्याची भीती व्यक्त करत "यांना यासाठीच निवडून दिले का ?" असा निर्वाणीचा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.
येत्या 15 मार्च रोजी नगराध्यक्षांनी सर्वसाधारण सभेचे आयोजन केले असून विषय सूचित कधी न घेतलेले तब्बत 29 विषय यावेळी ठेवले आहे. आधीच्याच उद्घाटन करण्यात आलेले कामे पूर्ण होताना नाही फक्त एक च विषय महत्वाचा मानला जात असून यातील 26 क्रमांकाचा विषय म्हणजे, "अर्जदार श्री. प्रभाकर गंगाराम शिंदे, सुचिता प्रभाकर शिंदे तर्फे श्री. सुमित रा. विश्वास राहणार वरोरा नुसार गडचांदूर नगरपरिषद हद्दीतील मो. वाजीद मो. शम्मी यांच्या मालकीचे जागेत माणिकगड रोड येथील मालमत्ता प्लॉट क्रमांक 9 मध्ये अनुज्ञाप्ती क्रमांक 60 देशी दारूचे दुकान लावण्यास ना-हरकत प्रदान करण्याबाबत, विचारविनिमय करून निर्णय घेण्याबाबत. विषय मांडण्यात आला मात्र आता या देशी दारू दुकानाने वेगळेच वळण घेतले.
NOC मागचा मास्टर माईंड कोण असेल?
मो.वाजीत मो शम्मी यांच्या मालकीचे मौजा न प हद्दीत मालमत्ता क्रं 9 आहे. सदर जागेवर असलेली रूम किरायाने देण्याचे मागील सहा महिण्यापासून त्यांनी ठरले होते. अचानक. एक महिण्या पूर्वी त्यांचे कडे सुमित रा. विश्वास रा.वरोरा या नावाचा व्यक्ती आला. रूम बघीतली व किरायाबाबत बोलले व मो.वाजीत मो शम्मी कडील कागदपत्र मागितले. आणि 15 तारखे पर्यंत मी तुम्हाला कळवितो म्हणाला परंतु रूम किरयाने घेतली नाही. कुठली रक्कम दिलेली नाही. व त्यांनी सदरची रूम ही देशी दारू करीता पाहिजे याबद्दल काहीही बोलला नाही. दुकान मालकाला देशी वा कुठल्याही दारू दुकाना करीता रूम द्यायची नाही.
असे असताना मो.वाजीत मो शम्मी यांच्या जागेवर स्थलांतरित दारू दुकाना करीता नाहरकत मिळण्याबाबत नगर परिषद गडचांदुर ला श्री सुमित विश्र्वास यांनी अर्ज केला आहे. असे वृत्तपत्रात व पोर्टल न्युज वरून माहिती पडले. मो.वाजीत मो शम्मी यांच्या सहीने नगर परिषदला कधीही कुठलाही अर्ज केलेला नाही. त्यांनी तदारू दुकान चालविण्या करीता नाहरकत मागितले असल्यास नाहरकत देवू नये. दिल्यास सर्वश्री जबाबदारी ही नगर परिषद ची राहील या बाबतीचे पत्र मो. वाजीत मो शम्मी यांनी नगर परिषदच्या नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांना दिले आता यावरून असे लक्षात येते की या मागचा मास्टर माईंड कोण नगर परिषद मध्ये नेमकी चालयल तरी काय असा प्रश्न नागरिकांन मध्ये निर्माण झाला आहे
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा
(
Atom
)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत