ब्रम्हपुरी:- तालुक्यातील धानोलीपोहा चक येथे विज पडून इसमाचा मृत्यू झाल्याची घटना आज दिनांक २२ एप्रिलला ५:३० वाजताच्या सुमारास घडली आहे. नवलाजी बळीजी लडके वय अंदाजे ४० धानोली पोहा चक येथिल रहिवाशी असे विज पडुन दुर्दैवी मुत्यु झालेल्या इसमाच नाव आहे.
सविस्तर वृत्त असे आहे की, मृतक नवलाजी हे मिळालेल्या माहिती नुसार घरच्या म्हशी राखायला गेला असल्याने चार पाच दिवसांपासून तालुक्यातच नाही तर विदर्भात अवकाळी पावसाने विजांच्या कडकडाने हजेरी लावली असुन आज सुद्धा अवकाळी पावसाने विजांच्या कडडाटासह हजेरी लावली त्या मध्ये म्हशी चारत असतांना नवलाजी च्या अंगावर विज पडून नवलाजीचा मृत्यु झाला.
व्हाईस ऑफ मीडियाच्या डिजीटल विभाग चंद्रपूर जिल्हा सरचिटणीसपदी भैरव दिवसे यांची नियुक्ती
मृतक नवलाजीच्या पच्छात्य पत्नी दोन मुले असा आप्त परिवार आहे. नवलाजी अत्यंत मनमिळावू स्वभावाचा व कुटुंबातील कर्ता इसम असुन त्याच्या जाण्याने लडके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.