Top News

लग्न वरात घेऊन जाणारी ट्रॅव्हल्स पलटी #chandrapur #accident


नागभीड:- नागभीड तालुक्यातील चिखलगाव जवळ लग्न लावून परत जात असताना ट्रॅव्हल्स क्र MH 12 KQ 0919 चा टायर फूटल्याने ट्रॅव्हल्स उलटली. यात 10 ते 15 वऱ्हाळी किरकोळ जखमी तर दोन वऱ्हाडी गंभीर जखमी झाले.


सिंदेवाही तालुक्यातील नांदगाव येथील वऱ्हाड घेऊन सावली तालुक्यातील गेवरा येथून लग्नकार्य आटोपून गावाला परततांना चिखलगाव नांदगाव हे तीन किलोमीटर अंतर पार करण्यापूर्वी चिखलगाव जवळ बस पलटली. घटनेची माहिती मिळताच तात्काळ हायवे पोलीस व तळोधी (बाळापूर) पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी दोन रुग्णवाहिका तात्काळ बोलावून जखमींना सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णलयामध्ये दाखल करण्यासाठी पाठविण्यात आले.

घटनेचा पुढील तपास तळोधी पोलीस स्टेशनचे ठाणेदार दिनकर शेंडे यांचे मार्गदर्शनात पोऊनी गोवर्धन, देहारे, संजय मांढरे व पो का. उमेश मस्के करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने