चंद्रपुरातील महाकाली यात्रेत पत्रकारांना मारहाण #chandrapur #Beatingjournalistsचंद्रपूर:- चंद्रपूरची आराध्यदैवत देवी महाकाली देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. राज्यभरासह आंध्र व तेलंगणा राज्यातील भाविकांचे जत्थे दर्शनासाठी दाखल झाले आहेत. पौर्णिमेपर्यंत येथे भाविकांची मोठी गर्दी राहणार असून त्यानंतर भाविकांचा परतीचा प्रवास सुरु होणार आहे.

चंद्रपूरच्या तापमानाची परवा न करता महाकाली यात्रेसाठी भाविकांची मोठ्या संख्येने हजेरी

देवीच्या यात्रेत चंद्रपूर जिल्हा प्रशासन व जनप्रतिनिधी यांनी सोयी सुविधेचा आढावा घेतला होता. मात्र प्रत्यक्षात कुणीही मूलभूत सुविधा भाविकांसाठी उपलब्ध करून दिल्या नाही, यावेळी सर्व भाविक भगवान भरोसे आपली व्यवस्था करीत आहे.

चंद्रपूर जिल्हा प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाची बातमी बनविण्यासाठी 5 एप्रिलला चंद्रपुरातील पार्थशर समाचार चे 2 प्रतिनिधी वार्तांकन करण्यासाठी गेले असता पोलिसांनी दोघांना पकडले व काही न विचारता त्यांना मारहाण केली.

पार्थशर समाचार चे प्रतिनिधी नेमन धनकर व सुनील देवांगण हे दोघे बातमी साठी झरपट नदीच्या पुलावर व्हिडीओ घेत होते, दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या अंघोळीची व्यवस्था व्यवस्थित नसल्याने भाविक झरपट नदीच्या घाटावर अंघोळ करीत आहे, त्याचे वार्तांकन करीत असताना शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी गेडाम यांनी दोघांना पकडले व काही न विचारता त्यांना मारहाण केली.ओळखपत्र असतानाही नेमन धनकर व सुनील देवांगण यांना बेदम मारहाण करून महाकाली परिसरातील पोलिस चौकीत नेण्यात आले. त्यांच्या जवळील मोबाइल हिसकावून घेतला व व्हिडिओ बातमी साठी घेण्यात आलेला व्हिडिओ रेकॉर्डिंग डिलीट करण्यात आला.
काही वेळात सुनील ने पार्थशर समाचार च्या संपादक राजेश नायडू यांना याबाबत माहिती दिली असता ते तात्काळ चौकीत पोहचले. कसलीही विचारणा न करता पत्रकारांवर पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांनी हात उचलायला नको, याविरोधात पार्थशर समाचार चे संपादक राजेश नायडू जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून त्यांना याबाबत निवेदन देणार आहे.

या घटनेमुळे पत्रकारांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून सर्व पत्रकार पोलिसांच्या या कृतीचा निषेध करत असून स्थानिक आमदार, खासदार, पालकमंत्री व महापालिका आयुक्तांनी या परिसराची पाहणी करून भाविकांसाठी योग्य व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आणि पत्रकारांच्या सुरक्षिततेसाठी व्यवस्था करा. अशी माहिती पार्थशर समाचारचे संपादक राजेश नायडू यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत