चोरी गेलेली दारू स्थानिक गुन्हे शाखेनी पकडली #chandrapur #LCB #lcbchandrapurचंद्रपूर:- दि 16/04/2023 व 17/04/2023 रोजीचे रात्री दरम्यान भेजगाव ता. मुल येथे आखिल गांगरेड्डीवार यांचे मालकीचे दारू भट्टीतुन 21 पेटी बियर कॅन चे बॉक्स, 1 पेटी देशी दारूची पेटी, तसेच काउंटरमध्ये ठेवलेले नगदी 2700 रू व देवघरातील नगदी 1500 रू असा एकुण 84,395/- रू चा मुद्देमाल चोरी झाल्याने पोस्टे मुल येथे अप.क्र. 147/ 23 कलम 461,380 भादंवी चा गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाचा स्थागुशा चंद्रपुर हे समांतर तपास करीत असतांना गोपनिय बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, चंद्रपुर शहर बंगाली कॅम्प परीसरात राजीव गांधी नगर चंद्रपुर येथे राहणारे राकेश महतो यांचे घरी चोरीची दारू लपवुन ठेवली आहे अशा माहीती वरून राकेश महतो रा. राजीव गांधी नगर चंद्रपुर याचे घरी पंचासमक्ष गेलो असता राकेश महतो हा पोलीसांना पाहुन मोटरसायकल पळून गेला. नमुद ईसमाचे पत्नी पुजा महतो व पंचासमक्ष झडती घेतली असता बाथरूम मध्ये लपवुन ठेवलेला चोरीचा मुद्देमाल बियरचे 18 बॉक्स एकुण 54,000 रू चा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त केला. तसेच सदर दारू ही राकेश महतो, विनोद उर्फ विक्की महतो व ईतर एक अनोळखी इसमाने आणुन ठेवल्याचे पुजा महतो सांगीतले. पोस्टे मुल अप. क. 147/ 23 कलम 461,380 भादवीचा गुन्हा नमुद आरोपीकडुन उघडकीस करण्यात आला.

सदरची यशस्वी कामगीरी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात पो. नि. महेश कोंडावार स्थानिक गुन्हे शाखा, पो.हवा. नितीन साळवे, पो. हवा. प्रकाश बलकी व पो.अ. मिलींद जांमुळे, सतिश बगमारे, मपोअं अपर्णा मानकर व चानापोका दिनेश अराडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत