चंद्रपूर जिल्ह्यात पुन्हा एक चोरी #chandrapur #pombhurna #theft

Bhairav Diwase

अज्ञात चोरट्यांची राईस मिलचे जुने स्पेअर पार्ट चोरले


पोंभुर्णा:- तालुक्यातील चिंतलधाबा गावालगत अशोक मुरलीधर बट्टूवार यांच्या मालकीची मॉं. गायत्री राईस मिल आहे. रात्रौला अज्ञातांनी गोडावून व राईस मिलचे शटरचे कुलूप तोडून आत असलेला लोखंडी वस्तू, मोटार, वजन माप इ. सामानाची चोरी केली.
चिंतलधाबा येथे गावाच्या बाहेर मॉं गायत्री राईस मिल आहे. राईस मिलवर ड्रायव्हर म्हणून राहुल वारलू ढुमणे रा. चिंतलधाबा तसेच विशाल कटकमवार राहणार हे देखरेख करीत असतो. राईस मिलचे मालक महिन्यात ०८ ते १५ दिवसांनी येऊन राईस मिलमधील सामानाची पाहणी करीत असतो. मॉ. गायत्री राईस मिल च्या बाजूला स्टोर रूम असून त्यात राईस मिल चे जुने स्पेअर पार्ट ठेवण्यात येते. विशाल कटकमवार हा नेहमीप्रमाणे सकाळी ९:०० वाजता राईस मिल खोलून सायंकाळी ५:३० वाजता च्या दरम्यान बंद करीत असतो.

आज दिनांक १८ एप्रिलला रोजी सकाळी ९ वाजता च्या दरम्यान मॉ. गायत्री राईस मिल वरील ड्रायव्हर राहुल ढुमणे हा राईस मिल उघडण्यासाठी गेला असता गोडाऊन व राईस मिलचे शटर चे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. याबाबत त्यांनी मालकाला माहिती दिली. राईस मिलचे मालक यांनी राईस मिल मध्ये येऊन सामानाची पाहणी केली असता त्यात ठेवलेले राईस मिल चे जुने लोखंडी सामान पैकी ०१ रबर, १० नग खाली पायली, ०९ पुल्ली, ०२ ब्लोवर, ०२ मोटार ०२ एचपी, ०१ मोटार ०५ एचपी, ०१ मोटार ०१ एचपी, १ मोटर १० एचपी, ०४ नग सबल, ०२ स्टारटर, ०४ एलीबेटर बॉक्स, ०८ नग सापटींग, लोखंडी वजन माप २५ किलो, २० किलो इ. वस्तू अज्ञात चोरांनी रात्रच्या दरम्यान राईस मिल व गोडाऊन शटर चे ताले तोडून चोरून नेले आहे. अशी तोंडीरिपोर्ट राईस मिल चे मालक अमोल मुरलीधर बट्टूलवार यांनी पोंभुर्णा पोलीस स्टेशनला दिली आहे.