नागभीड:- नागभीड (nagbeed) वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या मासली बिटच्या शेत संकुलातील विहिरीत पडून सुमारे दीड वर्षाच्या मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
पानोली येथील रहिवासी भैय्याजी मानकर यांच्या शेतात असलेल्या सायगाता रोडला लागून असलेल्या विहिरीत ४ दिवसांपूर्वी मादी बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळताच आज सकाळी वरील घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती वनविभागाला मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले, त्यांनी मृत बिबट्याला विहिरीतून बाहेर काढले, शवविच्छेदन करून घटनास्थळीच जाळून टाकले. मृत बिबट्याचे सर्व अवयव सुरक्षित होते. पशू विकास अधिकारी ममता वानखेडे यांनी शवविच्छेदन केले.
यावेळी ढेप संस्थेचे अध्यक्ष पवन नागरे, नागभीड वन परिक्षेत्र अधिकारी व वन कर्मचारी आदी उपस्थित होते.
#Chandrapur #Maharashtra #gadchiroli #India #Adharnewsnetwork Death of a girl #bhairavdiwase #police #Ghugghus #Police #Ingestionofpoison #Suicideattempt #Gandhinagar #girlfriend #wardhaRiver #Gondwanauniversitygadchiroli #SardarPatelmahavidyalayachandrapur #spcollegechandrapur #tataIPLmatch #ipl #ilplive #GTVsCSK #girlfriend #boyfriend #videocall #Naigaon #Ghugghus