चंद्रपूर जिल्ह्यात बर्निंग कारचा थरार! #Chandrapur #saoli #fire #burningcar #Chandrapurdistrict!


कारची झाडाला धडक; आगीत गाडी जाळून खाक


सावली:- सावली तालुक्यातील पाथरी जवळ असलेल्या असोलामेंढा नहराजवळ वळणावर वाहन चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी झाडाला धडकली. व वाहनाने पेट घेतला. प्रसंगावधान राखून ३ जण कारमधून बाहेर पडल्याने जीव वाचला ही घटना दि. १७ एप्रिलला ४:३० वाजताच्या सुमारास घडली. The thrill of burning cars in Chandrapur district!


राहुल रामचंद्र जुमनाके रा. संजय नगर चंद्रपूर व त्यांचे नातेवाईक गौरव कुसराम, सौरव कुसराम हे तिघेही एम.एच. 34 बी. आर. 5724 रेनॉल्ट ड्रायव्हर ट्रायबेर चार चाकी वाहनाने आसोलामेंढ्याला नातेवाईकांना सोडून दिले व आसोला मेंढा येथून परत येत असताना पाथरी जवळ नहरजवळ असलेल्या वळणावर वाहन चालक राहुल जुमनाके यांचे गाडीवरील नियंत्रण सुटून कार झाडाला धडकली. परंतु काही क्षणातच गाडीने पेट घेऊन गाडी पूर्णपणे जळून खाक झाली त्यापूर्वीच गाडीतील तिघेजण बाहेर पडले. या घटनेची माहिती पाथरी पोलिसांना कळतात घटनास्थळ गाठून वाहन चालकावर गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास पाथरी पोलीस करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत